फँन्सी नंबर प्लेटवर कारवाई होणार का ?

वाहतूक नियमांचे पालन कधी होणार
फँन्सी नंबर प्लेटवर कारवाई होणार का ?

नाशिक

विचित्र क्रमांकांच्या फॅन्सी नंबर प्लेटवर कारवाई होत नाही. यामुळे सरार्स भाऊ, नाना आणि दादा असे नंबर असलेल्या किंवा विचीत्र प्लेटचा वापर सर्वत्र सुरु आहे. आरटीओने दुचाकी व चारचाकी गाडय़ांचे नोंदणी क्रमांक कसे लिहावेत, यासंबंधी नियमावली स्पष्ट केली असतानाही ती सर्रास धाब्यावर बसवली जात आहे.

(सर्व छायाचित्र - सतीश देवगिरे)

काय आहेत नियम

वाहनांच्या नंबर प्लेटवरील अक्षरे व त्यांचा आकार ‘सेंट्रल मोटार व्हेइकल अॅक्ट’च्या कलम ५१ अन्वये ठरवून देण्यात आले आहेत. त्यानुसार वाहनांवर नंबर प्लेट लावणे कायद्याने बंधनकारक आहे.

– नंबर लिहिताना इंग्रजी (रोमन) लिपीचाच वापर करावा.

(उदा. ‘एमएच १५- एएन ७६५४’ ऐवजी ‘महाराष्ट्र १५- एएन ७६५४’ अशी नंबरप्लेट लावणे कायद्याने गुन्हा आहे. तसेच, हे क्रमांक देवनागरीतून लिहिणे नियमात बनत नाही.)

– दुचाकी वाहनांची पुढील नंबर प्लेटची लांबी २६ सेंमी, रुंदी ४ सेंमी, अक्षरांची उंची ३० मिलिमीटर असावी. अंकांची जाडी ५ मिलिमीटर असावी.

– पांढऱ्या पाटीवर काळी अक्षरे असावीत.

– नंबर प्लेटवर या क्रमांकाशिवाय इतर काहीही (नाव, नक्षी, चित्र, फोटो, आदी.) चालत नाही.

– हे क्रमांक स्पष्ट व सरळच असावे लागतात. ते फॅन्सी नसावेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com