Jallianwala Bagh Massacre : जालियनवाला बाग हत्याकांड घडवून आणणाऱ्या जनरल डायरचा असा घेतला बदला....

Jallianwala Bagh Massacre : जालियनवाला बाग हत्याकांड घडवून आणणाऱ्या जनरल डायरचा असा घेतला बदला....
जालियनवाला बाग

भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील काळा दिवस म्हणून ओळखला जाणारा आजचा दिवस आहे, १९१९ साली याच दिवशी (१३ एप्रिल) जालियनवाला बाग (Jallianwala Bagh Massacre) येथे जमलेल्या हजारो भारतीय नागरिकांवर ब्रिटिश फौजेकडून हल्ला गोळीबार करण्यात आला होता.

जालियनवाला बाग
जालियनवाला बाग

१३ एप्रिल १९१९ रोजी पंजाबमध्ये बैसाखी सणाच्या निमित्ताने अनेक शीख बांधव जालियनवाला बागेत जमले होते. यावेळी स्वातंत्र्य सैनिक सत्यपाल व सैफुद्दीन किचलूच्या अटकेचा लोकांनी निषेध नोंदवला होता. यावेळी जमावबंदीचा आदेश लागू होता ज्याचे उल्लंघन केल्याचे दिसताच या जमावावर गोळीबार करण्याचे आदेश जनरल डायर कडून देण्यात आले, त्यानुसार ९० ब्रिटिश सैनिकांनी १० ते १५ मिनिटांत बंदुकीच्या १६५० गोळ्या झाडल्या.

जालियनवाला बाग
जालियनवाला बाग

अंदाधुंद गोळीबार सुरू झाल्याने अनेक जण यामध्ये शहीद झाले. तर बचावासाठी धावाधाव करत असताना चेंगराचेंगरी झाल्याने अनेक जण जखमी झाले. काहींनी जीव वाचवण्यासाठी बागेतील खोल विहिरीत उड्या मारल्या होत्या. अमृतसर येथील ब्रिटिश कमिशनरच्या नोंदीनुसार या घटनेमध्ये ४८४ जण शहीद झाले. यात स्त्रिया आणि पुरूषांसोबत लहान मुलांचाही समावेश होता. हा इतिहास आपल्या सर्वांनाच माहीत आहे.

जनरल डायर
जनरल डायर

पण ज्या जनरल डायरने गोळीबार करण्याचे आदेश दिले होते त्याचा अंत देखील तितकाच भयावह झाला. जनरल डायरला मारणाऱ्या त्या वाघाचं नाव आहे शहीद उधम सिंग. सरदार शहीद उधम सिंग यांचा जन्म पंजाब च्या संगरूर जिल्ह्याच्या सुनाम गावात २६ डिसेंबर १८९९ साली झाला होता. जन्म झाल्याच्या २ वर्षानंतरच त्यांच्या आईचा मृत्यू झाला. आणि ८ वर्षाचे असतानाच वडील पण निघून गेले होते.

शहीद उधम सिंग
शहीद उधम सिंग

त्यांनतर त्यांनी आपल्या मोठया भावासोबत अमृतसर येथील अनाथाश्रमामध्ये त्यांच्या जीवनातील खूप वर्ष काढले होते. पण नंतर वर्ष १९१७ ला त्यांच्या मोठया भावाचे पण निधन झाले. त्यांनतर मात्र ते खूपच एकटे पडले होते. त्यानंतर त्यांनी १९१९ मध्ये आश्रम सोडून दिलं स्वतःला स्वतंत्रसंग्राम मध्ये झोकून दिले. त्याच वेळेस जालियनवाला बाग हत्याकांड जनरल डायर ने घडवून आणले होते.

शहीद उधम सिंग
शहीद उधम सिंग

हे सर्व हत्याकांड यांनी खूप जवळून पाहिले होते. यानंतर तर त्याच्या जीवनाचे एकच ध्येय होते ते म्हणजे 'जनरल डायच्या नरड्याचा घोट'. त्यासाठी त्यांनी तब्बल २१ वर्ष वाट बघावी लागली. डायरच्या नरडीचा घोट घेण्यासाठी त्यांचा प्रवास सुरू झाला. त्यासाठी ते नाव बदलून अनेक देशात जसे की आफ्रिका, नारौबी, ब्राझील, अमेरिका या देशात नाव बदलून वास्तव्य केले. ते १९४० साली लंडनला पोहचले. तेथे त्यांनी मोटारकार आणि ६ गोळ्यांची बंदूक खरेदी केली. अशी सर्व तयारी करून फक्त योग्य वेळेची वाट पाहत होते.

जनरल डायर
जनरल डायर

अखेर ती वेळी आली, जलियांवाला बाग हत्याकांड च्या २१ वर्षानंतर १३ मार्च १९४० साली इंग्लंडच्या रॉयल सेंट्रल एशियन सोसायटीच्या काक्सटन हॉलमध्ये बैठक होती. येथे जनरल डायर हा एक वक्ता म्हणून आमंत्रित झाला होता. अश्या प्रकारची संधी पुन्हा मिळणार नाही हे उधम सिंह यांना चांगल्या प्रकारे माहीत होते.

जलियांवाला बाग
जलियांवाला बाग

म्हणून ते आपल्या बंदुकीसह त्या कार्यक्रमामध्ये पोहचले होते. जेव्हा डायर व्यासपीठावर भाषण देण्यासाठी उभा राहिला तेव्हा उधम सिंह यांनी जनरल डायरवर नेम धरून पूर्ण बंदूक त्याच्यावर खाली करून टाकली. यामुळे जनरल डायर हा घटनास्थळावरच ठार झाला.

जालियनवाला बागेतील हुतात्म्यांचे स्मारक
जालियनवाला बागेतील हुतात्म्यांचे स्मारक

शहीद उधम सिंग यांना डायरच्या हत्येच्या आरोपाखाली ३१ जुलै १९४० रोजी फाशी दिली गेली. ज्या वेळेस कोर्टाने यांना फाशीची शिक्षा सुनावली होती त्यावेळेस पण त्यांच्या चेहऱ्यावर भीती नाही तर समाधान होत. ते आपल्या पूर्ण केलेल्या प्रतिज्ञा वर खुश होते. कारण जनरल डायर ला मारून त्यांनी आपली २१ वर्षं जुनी तपस्या पूर्ण केली होती.

(माहिती स्रोत : विकिपीडिया)

Related Stories

No stories found.