Friday, April 26, 2024
HomeUncategorized१३ वर्षांनंतर शिमल्यात विक्रमी बर्फबृष्टी

१३ वर्षांनंतर शिमल्यात विक्रमी बर्फबृष्टी

शिमला

हिमाचल प्रदेशात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार बर्फवृष्टी होत आहे. १३ वर्षांनंतर शिमल्यात विक्रमी २ फुट बर्फवृष्टी झाली. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

- Advertisement -

शिमला, मनाली, किन्नौर,लाहौल-स्पीती, चंबा, मंडी, सिरमौर व कांगडा परिसरात हिमपात झाला.

राजधानी शिमलात फेब्रवारी महिन्यात विक्रमी बर्फवृष्टी झाली. ५० सेंटीमीटरपेक्षा जास्त बर्फ पडला आहे.

मागील ३० वर्षांत फेब्रुवारी महिन्यात 1990 मध्ये 151.3 सेंटीमीटर, 12 फेब्रुवारी 2002 मध्ये 54.1 सेंटीमीटर तर 2007 मध्ये 113 सेंटीमीटर बर्फवृष्टी झाली.

बर्फवृष्टीमुळे शिमला शहरातील अनेक रस्ते बंद झाले आहेत. अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले. वीज तार व खांब तुटले आहेत.

शिमलाबरोबर प्रसिद्ध पर्यटन स्थळ, कुफरी,नारंकडा व खडापत्थर ही शहरे बर्फाने झाकून गेली आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या