रांजणगिरी पर्वतावरील नयनरम्य दृश्य

त्र्यंबकेश्वर तालूक्यातील निसर्गसौंदर्य बहरले आहे. यंदा करोनाच्या उद्रेकामुळे सर्वत्र लॉकडाऊन आहे. यामुळे पर्यटनस्थळे पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत. यंदाची श्रावणाची फेरीदेखील यंदा रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे निसर्गपर्यटकांचा हिरमोड झाला असला तरीदेखील अनेकजण सध्या निसर्गपर्यटनासाठी घराबाहेर पडलेले दिसून येत आहेत. त्र्यंबकेश्वर तालुक्यात पावसाळ्यात सर्वाधिक पर्यटकांची मांदियाळी असते. येथील रांजणगिरी पर्वतावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या नाशिकच्या प्रणित गर्भे यांनी काढलेले काही आकर्षक छायाचित्रे.
रांजणगिरी पर्वतावरील नयनरम्य दृश्य
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com