PHOTO : सुंदर ते ध्यान उभे विटेवरी.. विठुरायाच्या गाभाऱ्यात 'रामनवमी'निमित्त सफरचंदाची नयनरम्य आरास

PHOTO : सुंदर ते ध्यान उभे विटेवरी.. विठुरायाच्या गाभाऱ्यात 'रामनवमी'निमित्त सफरचंदाची नयनरम्य आरास
Published on
2 min read

आज रामनवमी. रामनवमीचा आज देशभरात उत्साह आहे. चैत्र शुद्ध नवमी हा हिंदू पंचागानुसार चैत्र महिन्यातील नवरात्राचा नववा दिवस आहे.

या तिथीस भगवान विष्णूचा सातवा अवतार समजले गेलेले श्री राम यांचा जन्म झाला, अशी मान्यता आहे. हा दिवस श्री रामनवमी म्हणून साजरा करतात.

पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने देवाच्या गाभाऱ्यात सफरचंदाची मनमोहक आरास केली आहे.

पुणे येथील भक्त भारत रामचंद्र यादव यांनी सफरचंद आणि फुलांचा वापर करीत ही सजावटीची सेवा दिली आहे.

लालेलाल रंगाचे हे कश्मिरी सफरचंद देवाचा गाभारा, सोळखांबी आदी दर्शनी भागात लावले आहे.

सावळा विठुराया जणू काही सफरचंदाच्या बागेत उभा आहे की काय असा भास होतो.

Related Stories

No stories found.