राजा रवि वर्मा : आधुनिक भारतीय कलेचे जनक

आज आपल्याला कैलेंडर, वह्या किंवा पुस्तकांमध्ये जे देवीदेवतांचे फोटो दिसतात ते 'राजा रवि वर्मा' यांच्यामुळेच...
राजा रवि वर्मा : आधुनिक भारतीय कलेचे जनक
Published on
4 min read

कोणत्याही व्यक्तिची ओळख ही त्यांनी जगाला दिलेल्या मुल्यांवर किंवा जगाला दिलेल्या वर्षावर अवलंबून असते. सामान्य माणसांना अस वाटल की समोरची व्यक्ती आपल्याशी जोडली गेली नसती तर आपल आयुष्य जरा कमी चांगल असत, असाधारण व्यक्तीच समाजात आपले वेगळे स्थान निर्माण करते.

राजा रवि वर्मा (Raja Ravi Varma) त्यातीलच व्यक्ती. नावात जरी राजा असल तरी त्यांच्याकडे ना कोणते राज्य होते न कोणती जमीन. रवि वर्मा यांना ही पदवी तत्कालीन व्हाइसरॉय यांनी सन्मानार्थ दिली होती.

आज आपल्याला जे कैलेंडर, वह्या किंवा पुस्तकांमधे जे देवीदेवतांचे फोटो दिसतात ते राजा रवि वर्मा यांच्यामुळे आणि त्यांच्या कल्पनाक्षमतेमुळे. खरतर रवि वर्मा यांची ओळख निर्माण झाली ती त्यांच्या प्रसिद्ध तैलरंगाच्या चित्रांमुळे. त्यांचे अनेक नावाजलेले पेन्टिंग्ज हे ऑइल पेंटमध्येच रंगवलेले आहेत. त्याचे कारण म्हणजे एकतर तैल रंगानी चित्राचा रंग उजळून दिसतो आणि अनेक वर्ष अशी चित्रे संभाळून ठेवणे सोपे होते.

राजा रवि वर्मा यांचा जन्म केरळमधील किलीमोनुर नामक गावात 29 एप्रिल 1848 मध्ये झाला. त्यांचे काका तंजावर शैलीचे चित्रकार, आई उमा अंबाबाई तंपुराट्टी एक सिद्ध कवयित्री होती, तर वडील एजिमाविल भट्टतिरिप्पाट हे संस्कृतचे विद्वान होते. रवि वर्मा 6 वर्षांचे असतानाच त्यांनी घराच्या भिंतींवर जंगली प्राणी, विशेषतः हत्ती व इतर लहान लहान चित्रं रेखाटली होती.

ते रेखाटन कौशल्य आणि सहजता पाहूनच त्यांच्या चित्रकार काकाने स्वतःला अवगत असलेली चित्रकलेची तंत्र आणि सिद्धांत त्यांना शिकविले. याच काकांचे राजवाड्यात येणे-जाणे असल्यामुळे रवि वर्मा 9 वर्षांचे असताना ते त्यांना राजवाड्यात घेऊन गेले. तेव्हा त्यावेळचे महाराज आयील्यम तिरुनाल या छोट्या चित्रकाराच्या कलेने प्रभावित झाले आणि त्यांनी रवि वर्मा यांना राजमहालात राहण्याचे आदेश दिले.

त्यावेळी राजचित्रकार रामस्वामी नाईकर यांचा पाश्चात्य चित्रशैलीत हातखंडा होता. तसेच डच भित्तीचित्रकार थिओडोर जॉन्सन हेही त्रिवेंद्रमला भेटी देत असत. या दोघांच्या संपर्कामुळे आपण चित्रकारच व्हायचे, असे रवि वर्मा यांनी निश्चित केले. राजमहालातील तेव्हाच्या 9 वर्षांच्या कालावधीत रवी वर्मा यांनी अनेक अपरिचित रंग-तंत्रात प्रयोग केले, रंग मिश्रणातील कौशल्य आत्मसात केले.

निसर्ग दृश्ये, मानवाकृतीचा तपशीलवार अभ्यास केला. त्याकरिता त्रावणकोरच्या राजाने आपल्या संग्रहातील युरोपीयन कलाकारांच्या तैलचित्रांचा खजिना त्यांना उपलब्ध करून दिला. एकीकडे त्यांना अपार लोकप्रियता मिळत होती त्याचबरोबर त्यांना नावे ठेवणार्‍यांची पण कमतरता नव्हती. राजा रवि वर्मा यांची कल्पनाक्षमता या सर्वांच्या पलिकडचि होती. रवि वर्मा यांनी चित्रकलेत असे प्रयोग केले जे त्याआधी कुणीही केले नव्हते. आणि म्हणूनच त्यांची चित्रकारिता त्यांना अनेक नवनव्या उंचीवर घेऊन गेली.

आपल चित्रकलेच प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर रवि वर्मा यांना त्यांच्या चित्रांचा विषय सूचत नव्हता. त्यासाठी त्यांनी भारतभ्रमण केले. अनेक ठिकाणी फिरले आणि भारताचा आत्मा समजून घेण्याचा प्रयत्न केला. खुप फिरल्यानंतर त्यांच्या लक्षात आल की भारताचा आत्मा हा भारतीय महाकाव्य आणि भारतीय ग्रंथ यात आहे. त्यांनी ठरविले की या ग्रंथांमधील चरित्रांवर आधारित आपण पेन्टिंग्ज काढले पाहिजे. रवि वर्मा यांनी अनेक पौराणिक कथांमधील पात्रांना आपल्या चित्रांमधुन कॅनव्हासवर उतरविले. त्यांनी अनेकदा दक्षिण भारतीय सुंदर स्रियांवर हिंदू देवींची चित्रे दर्शविली.

आज पोस्टर्स किंवा कैलेंडर्स वर माता सरस्वती, माता लक्ष्मी, दुर्गा माता,राधा कृष्ण यांचे जे फोटो पाहतो ती रवि वर्मा यांचीच कल्पनाक्षमता आहे. त्यांची अनेक चित्रे आजही बडोद्यातील लक्ष्मी विलास पैलेस मध्ये सुरक्षित आहेत. विचारात मग्न असलेली युवती, दमयंती-हंसा यांच संभाषण, संगीत सभा,अर्जुन आणि सुभद्रा, विरहाने व्याकुळ झालेली युवती, शकुंतला, रावणाद्वारा केला गेलेला जटायुचा वध, द्रौपदी कीचक, राजा शांतनु आणि मत्स्यगंधा, शकुंतला आणि राजा दुष्यंत ही त्यांची काही प्रसिद्ध चित्रे आहेत.

देवदेवतांना आपल्या सामान्यजनांच्या हृदयात मानाचे स्थान मिळवून दिले. इतकेच नाही, तर त्या-त्या देवतेचे तेच रूप अजरामर केले. राजा रवी वर्मा यांना आधुनिक भारतीय कलेचे जनक अशी उपाधी दिली गेली. त्यामुळेच आधुनिक भारतीय कलेचे जनक म्हणून त्यांना नावाजले जाते.

राजा रवि वर्मा यांना वयाच्या 56 व्या वर्षी त्यावेळचा सर्वात मोठा सन्मान केसर-ए-हिंद देण्यात आला. हा सन्मान म्हणजे आजचा भारतरत्न असा मानला जातो. हा सन्मान पटकविणारे राजा रवि वर्मा पहिले कलाकार होते.

Related Stories

No stories found.