Wednesday, April 24, 2024
HomeUncategorizedPhoto Gallery : जिंगल बेल्स, जिंगल बेल्स जिंगल ऑल द वे...

Photo Gallery : जिंगल बेल्स, जिंगल बेल्स जिंगल ऑल द वे…

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाताळ अर्थात ख्रिसमस सणाला अवघे काही दिवस उरले आहे. शहरातील व्यापारीवर्ग ख्रिसमससाठी (Christmas) सज्ज झाला आहे. खरेदीसाठी नागरिक बाजारात हळूहळू गर्दी करत असल्याचे चित्र आहे. शहरातील मुख्य बाजारपेठा ख्रिसमसच्या निमित्ताने पुन्हा एकदा गजबजल्या आहेत…

- Advertisement -

नाताळच्या निमित्ताने शहरातील प्रत्येक चर्चमध्ये (Church) सजावट आणि रंगरंगोटीच्या कामे जोमाने सुरु आहेत. तसेच आपापले घर सजवण्यासाठीदेखील ख्रिस्ती बांधव आता बाजारपेठेत खरेदी (Shopping) करत आहेत.

मेनरोड, रविवार कारंजा, सिटी सेंटर मॉल, शालीमार, शरणपूररोड, देवळालीसह शहरातील अन्य बाजारपेठा सजल्या आहेत. दुकानांमध्ये सांता क्लॉज, ख्रिसमस ट्री, ख्रिसमस बेल, सांता कॅप, चॉकलेट्स, केक, चॉकलेट वाईन केक्स, जिंगल्स साँग टॉईज आणि वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य विक्रीसाठी दाखल झाले आहेत.

ख्रिसमस हा जगातील लोकप्रिय उत्सवांपैकी एक आहे. ख्रिश्चन धर्माचा हा मुख्य सण आहे. या दिवशी देव येशू ख्रिस्त यांचा जन्म झाला. ख्रिश्चन समुदाय हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतात. या दिवशी सर्वत्र सुट्टी असते.

मुलांमध्ये देवावरील प्रेम आणि विश्वास टिकवून ठेवण्यासाठी विशेषतः या दिवशी अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

ख्रिसमस वृक्ष सजावट हा या सणाचा एक अविभाज्य घटक आहे. याच दिवशी रात्री सांता क्लॉज लहान मुलांसाठी भेटवस्तू वाटतो असे मानले जाते.

आजच्या काळात ख्रिसमस सणाला धार्मिकतेसोबतच सामाजिक महत्वदेखील प्राप्त झाले आहे.

इंग्रजी भाषिक देशांमधील नागरिक या दिवशी एक विशेष प्रकारची पुडिंग व केक बनवतात.

- Advertisment -

ताज्या बातम्या