Photo Gallery : आता नाशिकमध्ये घेता येईल केदारनाथचे दर्शन

Photo Gallery : आता नाशिकमध्ये घेता येईल केदारनाथचे दर्शन

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

वाढोली (Vadholi) येथे शिवशक्ती ज्ञानपीठाच्या आश्रमात श्री स्वरुपेश्वर बाणेश्वर महादेव मंदिर (Sri Swarupeshwar Baneshwar Mahadev Temple) हे पुणे (Pune) येथील श्रुतीसागर आश्रमाच्या माध्यमातून साकारण्यात आले आहे. अंजनेरी (Anjaneri) पर्वतरांगेत हे मंदिर असून ‘प्रतिकेदारनाथ’ म्हणून अलीकडे हे मंदिर प्रचलित झाले आहे. सध्या भाविकांचे हे मंदिर मुख्य आकर्षण ठरत आहे...

मंदिराचे लोकार्पण २०१४ साली झाले आहे. मंदिराची संकल्पना माताजी स्वामी स्थितप्रज्ञानंद यांच्या माध्यमातून पुढे आले आहे. गेल्या काही दिवसांपासून हे मंदिर सोशल मीडियात प्रसिद्ध होत आहे.

अंजनेरी पर्वत रांगेत चार एकरच्या जागेत हे मंदिर साकारण्यात आले आहे. मंदिर परिसरात भक्त निवास, भागवतपूज्यपाद आदी शंकराचार्य आश्रम, दुर्गा परमेश्वरी मंदिर आहे. सामान्य नागरिकांमध्ये आध्यात्मविद्येचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी हे मंदिर पुण्यानंतर त्र्यंबकेश्वरमध्ये स्थापन करण्यात आले आहे.

म्हणून प्रसिद्ध झाले मंदिर

या मंदिर परिसरात फोटो, व्हिडीओ घेण्यास मनाई आहे. परंतु सोशल मिडीयावर या मंदिराचे फोटो व्हायरल झाले आणि प्रति केदारनाथ म्हणून हे मंदिर प्रसिद्ध झाले आहे, अशी माहिती पंढरीनाथ महाराज यांनी दिली आहे.

असा आहे मंदिराचा मार्ग

गेल्या काही दिवसांपासून या मंदिरात दर्शनासाठी भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करत असल्याचे दिसून येत आहे. या मंदिरात जाण्यासाठी नाशिकहून त्र्यंबकमार्गे अंजनेर फाटा, मुळेगाव बारी, वाढोली असा मार्ग आहे. मुंबई, पुण्यासह अन्य शहरातून भाविक येथे येत असल्याचे दिसून येत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com