Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedअनुभवसिद्ध राजकारणी...

अनुभवसिद्ध राजकारणी…

भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी (Former President Pranab Mukherjee) यांचे आज दिल्लीच्या आर्मी हॉस्पिटलमध्ये निधन झाले. ते ८४ वर्षाचे होते. प्रणव मुखर्जी यांना संसदीय राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव होता. त्यांना असलेली भारतीय राजकारणाची जाण थक्क करणारी होता.

प्रणव मुखर्जी(Pranab Mukherjee) यांचा जन्म ११ डिसेंबर १९३५ मध्ये पश्चिम बंगाल येथे जन्मलेल्या प्रणव मुखर्जी यांनी सर्वसामान्य काँग्रेस कार्यकर्ता ते आमदार, खासदार, पक्षनेता, केंद्रीय मंत्री ते राष्ट्रपती अशा विविध पदांवर काम केले.

- Advertisement -

प्रणव मुखर्जी यांनी काही काळ पोस्ट अँड टेलेग्राफ कार्यालयात ते क्लार्क म्हणून देखील काम केले. पुढे 1963 मध्ये ते विद्यानगर महाविद्यालया राज्यशास्त्राचे प्रोफेसर झाले. या काळात ते देशेर टाक या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून देखील काम करत.

प्रणव मुखर्जी यांनी १९६९ मध्ये आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. काँग्रेस पक्षाच्या(congress) तिकिटावर ते राज्यसभा खासदार म्हणून निवडूण आले.

पुढे सलग 4 वेळा ते काँग्रेसचे राज्यसभा खासदार राहिले. या काळात माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांचे निकटवर्तीय म्हणूनही ते ओळखले जात. इंदिरा गांधी(indira gandhi) यांच्या मंत्रिमंडळात ते केंद्रीय मंत्रीही होते.

२०१३ मध्ये ते युपीएकडून(UPA) राष्ट्रपती पदाचे उमेदवार होते. या निवडणुकीत एनडीएचे (NDA) उमेदवार पी. ए. संगमा (P A Sangama) यांचा त्यांनी पराभव केला. 25 जुलाई 2012 या दिवशी त्यांनी देशाचे 13 वे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली.

- Advertisment -

ताज्या बातम्या