Sunday, April 28, 2024
HomeUncategorizedभारतातील पहिल्या वर्ल्ड क्लास रेल्वे स्थानकाचे फोटो पाहिलेत का?

भारतातील पहिल्या वर्ल्ड क्लास रेल्वे स्थानकाचे फोटो पाहिलेत का?

देशाच्या पहिलं वर्ल्ड क्लास रेल्वे स्थानक हबीबगंजचं (Habibganj Railway Station) उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते आज झालं.

हबीबगंज रेल्वे स्थानकाचे नाव बदलून राणी कमलापती असे करण्यात आले आहे.

- Advertisement -

भोपाळचं हबीबगंज रेल्वे स्थानक हे देशातील पहिलं वर्ल्डक्लास रेल्वे स्थानक म्हणून ओळखलं जाणार आहे.

एखाद्या एअरपोर्ट प्रमाणं स्थानकाची निर्मिती कऱण्याची आली आहे. यात पार्किंगपासून ते हॉटेल्स वगैरे सर्व सुविधा उपलब्ध असणार आहेत.

हबीबगंज रेल्वे स्थानकाचं नाव हबीब मियाँ यांच्या नावावरुन ठेवलं आहे. याआधी या रेल्वे स्थानकाचं नाव शाहपूर होतं.

हबीब मियाँ यांनी 1979 रोजी स्थानकाच्या विस्तारासाठी आपली जमीन दान केली होती. त्यानंतर या रेल्वे स्थानकाचं नाव हबीबगंज असं ठेवण्यात आलं होतं.

भोपाळवर 16व्या शतकात गोंड शासकांचे राज्य होते आणि गोंड राणी राणी कमलापतीची स्मृती कायम ठेवण्यासाठी हबीबगंज रेल्वे स्थानकाचे नाव राणी कमलापतींच्या नावावर ठेवण्यात आले आहे.

सार्वजनिक आणि खासगी भागीदारीतून बांधण्यात आलेल्या या रेल्वे स्थानकाच्या उभारणीसाठी ४५० कोटी रुपयांचा खर्च आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या