
भुसावळ - bhusawal
काही दिवसांपूर्वीच रिलीज झालेला व सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा (Pushpa's film) ‘पुष्पा’ चित्रपटाचे (Dialog) डॉयलाग सोशल मिडीयावर (Social media) धुम करत आहेत.
या डॉयलॉगचा सदुपयोग करत (bhusawal) भुसावळ पालिकेने ‘माझी वसुंधरा व (Clean survey) स्वच्छ सर्व्हेक्षण’ या उपक्रमांतर्गत शहरात ठकठिकाणी दर्शनी भागातील भिंतींवर चित्रस्वरूपात रंगरंगोटी करून स्वच्छता संदेश देण्याचा प्रयत्न केला.
या संदेशातील सर्वात आकर्षण ठरत असलेला ‘पुष्पा’ चित्रपटातील एक डायलॉग ‘मै झुकेंगा नही...’ या वाक्याचा उपयोग करत ‘मै थुकेंगा नही...’
ऐसी नस दबाऊगा की खुद झाडु लेके साफ सफाई करने निकलेंगे...
निळु फुलें (कामेडीमॅन) यांच्या शैलीत - बाई कचरा, घंटा गाडीत टाका
अशापध्दतीचे स्वच्छता संदेश आकर्षक रंगरंगोटी करून शहरातील भिंती बोलक्या झालेल्याने त्या सर्वांना आकर्षीत करत आहेत.
यात जळगाव रोड, जामनेर रोड, जलशुध्दीकरण केंद्र, नगरपालिका प्रशासकीय इमारत, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदान आदी ठिकाणच्या भींती स्वच्छता संदेशाने बोलक्या करण्याचा प्रयत्न पालिकेने केला आहे.
येत्या काळात स्वच्छते संदर्भात गुणानुक्रम वाढविण्यासाठी स्वच्छता विषयक उपक्रमांवर भर दिला आहे.
त्याचाच भाग म्हणून शहरात ‘माझी वसुंधरा’ उपक्रमातून स्वच्छते संदर्भात जनजागृती करणारे संदेश चित्ररूपात रेखाटली आहेत.
वर्दळीच्या ठिकाणी सर्वांचे लक्ष केंद्रीत होईल अशा ठिकाणी स्वच्छतेचा संदेश देणारी चित्रे काढली आहेत, जेणेकरून जनजागृती व प्रबोधन होईल असे स्वच्छ सर्व्हेक्षणाचे प्रमुख नितीन लुंगे यांनी सांगितले.