
त्र्यंबकेश्वर | Trimbakeshwar
यंदा दिवाळीनंतरच त्र्यंबक तालुक्यात भात काढणी सुरू होईल असे चित्र शेतात दिसत आहे. तालुक्याच्या विविध भागातील भात शेती पाहता सर्वत्र भात निसवणीसाठी आलेले आहे. अनेक ठिकाणी पीक जोमात आहे तर काही ठिकाणी पिवळे पडले आहे...
दरवर्षी दसऱ्यानंतर म्हणजे दिवाळीच्या अगोदरच भात कापणी सुरु होते. यंदा मात्र दुबार पेरणीमुळे भाताचा हंगाम लांबला आहे. विविध भागात फेरफटका मारला असता सर्वत्र इंद्रायणीचा भाताचा सुगंध येत आहे.
त्रंबक तालुक्यात कोणतीही नुकसान भरपाई शासनाने शेतकऱ्यांना दिलेली नाही. महसूल विभाग, कृषी विभागाचे शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष घालीत नाही असे शेतकऱ्यांच्या बोलण्यातून जाणवते.
दरम्यान, सततच्या पावसाने (Rain) सर्वत्र निसर्गसृष्टीला तजेला हिरवेगारपणा टिकून आहे. बांधाला खुरासनी जोरात फुललेली आहे.