Friday, April 26, 2024
HomeUncategorizedPhoto Gallery : ‘ही’ आहेत स्कॉटलंड येथील देखणे राजवाडे

Photo Gallery : ‘ही’ आहेत स्कॉटलंड येथील देखणे राजवाडे

स्कॉटलंड – Scotland

स्कॉटलंड म्हटले, की हिरव्यागार कुरणांच्या पार्श्वभूमीवर दिमाखात उभे असणारे राजवाडे आपल्या डोळ्यांसमोर उभे राहतात. स्कॉटलंडमध्ये अनेक प्रसिद्ध अलिशान राजवाडे आहेत.

- Advertisement -

यापैकी ‘डनरॉबिन कासल’ स्कॉटलंडच्या उत्तरी सागरी किनार्‍याच्य लगत, डोरनॉख जवळ आहे. एखाद्या परीकथेतील असावा तसा भासणारा डनरॉबिन कासल उत्तर स्कॉटलंडमधील सर्वात मोठा राजवाडा आहे.

या राजवाड्याची निर्मिती 13व्या शतकातील असून, भव्य अशा या राजवाड्यामध्ये 180 कक्ष आहेत. ‘ड्युक्स ऑॅफ सुदरलंड’चे हे अनेक पिढ्यांपासूनचे औपचारिक निवासस्थान असून, सर चार्ल्स बॅरी यांनी या राजवाड्यामध्ये अनेक नवी बांधकामे करविली. त्यामध्ये या राजवाड्याच्या चहु बाजूंना बांधविण्यात आलेल्या मनोर्‍यांचा समावेश आहे.

स्कॉटलंड येथील आणखी एक प्रसिद्ध ठिकाण म्हणजे ‘फ्लोर कासल’. टवीड नदीच्या जवळ आणि चेविओ पर्वतराजीच्या सान्निध्यात हा राजवाडा उभा आहे. ड्युक व डचेस ऑॅफ रॉक्सबर्ग आणि त्यांच्या परिवाराचे हे औपचारिक निवासस्थान असून, स्कॉटलंडमधील सर्वात मोठ्या राजवाड्यांपैकी हा एक आहे.

या राजवाड्यामध्ये अनेक प्राचीन पेंटींग्ज आणि शिल्पांचा खजिना असून, या राजवाड्याच्या परिसरातून ‘हॉली ट्री’चे ही दर्शन घडते. 1460 साली युद्धामध्ये मारले गेलेले इंग्लंडचे राजे जेम्स (दुसरे) ज्याठिकाणी धारातीर्थी पडले, त्या ठिकाणी हे ‘हॉली ट्री’ उभे असल्याचे म्हटले जाते.

‘कल्झीयन कासल’ ही अठराव्या शतकातील वास्तू मेबोल येथे, आयरशरच्या समुद्रकिनार्‍याजवळ आहे. एका डोंगरावर उभा असलेला हा राजवाडा नयनरम्य निसर्गाने वेढलेला आहे. या राजवाड्याला इतिहासही मोठा आहे. या वास्तूची रचना रॉबर्ट अ‍ॅडम यांनी ‘नियो-काल्सिकल जॉर्जियन’पद्धतीची करविली होती.

‘कासल फ्राझर’अ‍ॅबर्डीनशर येथे असून, ही वास्तू झपाटलेली आहे असे म्हटले जाते. या वास्तूमध्ये एका राजकन्येची हत्या झाली असून, त्यानंतर ती अनेकांना येथे दिसत असल्याचे म्हटले जाते. तसेच या वास्तूमधून वेळी अवेळी पियानोचे स्वरही कानी पडत असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या