Photo Gallery : गोदाकाठावरील भगवान शंकरांच्या मंदिरांचे दर्शन घ्या एका क्लिकवर

महाशिवरात्री विशेष
Photo Gallery : गोदाकाठावरील भगवान शंकरांच्या मंदिरांचे दर्शन घ्या एका क्लिकवर
छायाचित्र - सतिष देवगिरे.

आज महाशिवरात्र. महादेवाची उपासना करण्याचा खास दिवस. यादिवशी भगवान शंकराच्या मंदीरांमध्ये भाविकांचा मेळा जमतो. यानिमित्ताने नाशिकमधील गोदाकाठच्या भगवान शंकरांच्या काही मंदीरांची माहिती.

तिळभांडेश्वर
तिळभांडेश्वर छायाचित्र - सतिष देवगिरे.

तिळभांडेश्वर

हे मंदिर 1763 मध्ये सरदार त्र्यंबकराव पेठे (पेशव्यांचे मामा) यांनी बांधले होते. हे नाशिकमधील सर्वात मोठे शिवलिंग देखील आहे. ब्रिटीश राजवटीत, मंदिराच्या व्यवस्थापनासाठी सार्वजनिक ट्रस्ट अस्तित्वात आले.

निळकंठेश्वर
निळकंठेश्वरछायाचित्र - सतिष देवगिरे.

निळकंठेश्वर

स्थापना 1747 मध्ये झाली आहे. सरदार राजेबहाद्दूर यांनी याचे निर्माण केले आहे.

अद्वैतेश्वर
अद्वैतेश्वरछायाचित्र - सतिष देवगिरे.

अद्वैतेश्वर

स्थापना - 1772. येथे भटजी महाराजांची संजीवनी समाधी आहे. मंदीर एकमुखी दत्त मंदीराच्या मागे.

पशुपतीनाथ
पशुपतीनाथछायाचित्र - सतिष देवगिरे.

पशुपतीनाथ

मंदीराची स्थापना 1853 साली झाली. हे स्वयंभू मंदीर असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. मंदीर बालाजी कोठावरील वाड्यात आहे.

तारकेश्वर
तारकेश्वरछायाचित्र - सतिष देवगिरे.

तारकेश्वर

हे मंदिर कृष्णदास परांजपे यांनी १७८० मध्ये बांधले. मंदीराचे व्यवस्थापन खासगी पद्धतीने पाहिले जाते. मंदीर रामसेतु पुलाजवळ आहे.

टाळकुटेश्वर
टाळकुटेश्वरछायाचित्र - सतिष देवगिरे.

टाळकुटेश्वर

स्थापना - सन 1783. बुधवार पेठेत राहणारे सोपानदेव बालकराम टाळकुटे यांनी सन 1783 साली टाळकुटेश्वर मंदिराची निर्मिती केली. हे मंदीर संत गाडगेमहाराज धर्मशाळेजवळ आहे.

सिद्धेश्वर
सिद्धेश्वरछायाचित्र - सतिष देवगिरे.

वृद्धेश्वर

वृद्धेश्वर महादेव मंदिराची स्थापना 1763 मध्ये दुर्वे कुटुंबाने केली. याचेही व्यवस्थापन सार्वजनिकरित्या केले जाते. हे मंदीर गोरेराम लेन मध्ये आहे.

काशिविश्वेश्वर
काशिविश्वेश्वरछायाचित्र - सतिष देवगिरे.

काशिविश्वेश्वर

स्थापना 1786 साली करण्यात आली. हे मंदीर अहिल्यादेवी होळकरांनी बांधले आहे. ेते गोदाघाटावर अहिल्यादेवी व्यायामशाळेशेजारी आहे.

कपालेश्वर
कपालेश्वर छायाचित्र - सतिष देवगिरे.

कपालेश्वर

स्थापना - 1738. शंकराच्या मंदीरासमोर नंदी नसलेले बहुधा हे एकमेव मंंदीर असल्याचे सांगितले जाते. मंदीर रामकुंडाजवळ आहे.

पंचरत्नेश्वर
पंचरत्नेश्वर छायाचित्र - सतिष देवगिरे.

पंचरत्नेश्वर

या मंदिराची स्थापना 1758 मध्ये झाली. हे मंदीर कापड पेठेतील मुरलीधर मंदीराच्या शेजारी आहे.

मुक्तेश्वर
मुक्तेश्वर छायाचित्र - सतिष देवगिरे.

मुक्तेश्वर

ह्या शिवलिंगाची स्थापना तत्कालीन नगरपालिका नगराध्यक्ष श्रीपाद भिकाजी करडे यांनी केली. मंदीर रोकडोबा पटांगणाजवळ आहे.

नारोशंकर
नारोशंकरछायाचित्र - सतिष देवगिरे.

नारोशंकर

स्थापना - 1747. मंदीर सरदार राजेबहाद्दरांनी बांधले आहे. नारोशंकर मंदीरावरील घंटा प्रसिद्ध आहे. मंदीर रामसेतु पुलाजवळ आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com