Photo Gallery : इगतपुरीवर हिरवी शाल; बंदी झुगारून छुप्या मार्गाने पर्यटक करतायेत सुट्टी साजरी

Photo Gallery : इगतपुरीवर हिरवी शाल; बंदी झुगारून छुप्या मार्गाने पर्यटक करतायेत सुट्टी साजरी

इगतपुरी । प्रतिनिधी Igatpuri

मागील आठवड्यापासुन इगतपुरी तालुक्यात जोरदार पावसाला सुरुवात झाल्याने तालुक्यातील धरण साठयात कमालीची वाढ झाली आहे. (Igatpuri Dam Position Increased) या पावसामुळे ठीक ठीकाणी डोंगर ऊतारावरून पाण्याचे धबधबे (Water Fall) सुरू झाल्याने पर्यटकांची इकडे गर्दी वाढत आहे. तालुक्यात भावली डॅम (Bhavali Dam), अशोका धबधबा (Ashoka Waterfall), वैतरणा डॅम (Vaitarna Dam), भंडारदरा धरण (Bhandardara Dam), दारणा धरण (Darna Dam) भाम धरण (Bham Dam) आदी ठीकाणी पर्यटनासाठी मोठी गर्दी होत आहे. ...

कोरोनाचा काळ असल्याने येथे पर्यटकांना येण्यासाठी बंदी असुनही चोरी छुप्या मार्गाने पर्यटक शनिवार व रविवारी मोठया प्रमाणात हजेरी लावत आहे. इगतपुरी तालुक्याचा स्वर्ग समजला जाणारा भावली धरण परिसर... (Crowd increased in Igatpuri taluka)

निसर्गराजाने नेत्रात साठवता येणार नाही एवढी भरभरुन दिलेली वनराई...मंद मंद धुंद करणारा पाऊस...क्षणात पालटणारे धुकेमय वातावरण...घनदाट वृक्षांची छाया...मुक्तहस्ते निर्मित धबधबे...खोल खोल दऱ्या...हंबरत हंबरत मंजुळपणे चरणारी गायी गुरे...किलबिलाट करणारे पक्ष्यांचे थवे...रानफुलांचा मंद मंद सुगंध...शेकडो पर्यटकांचे असे अनेकानेक अंगांनी नटुन थटुन स्वागत करणारा भावली धरण परिसर आहे. (Nature Tourisam)

या पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी मुंबई, नाशिक, पुणे (Mumbai, Nashik, Pune) अशा महाराष्ट्राच्या विविध भागातुन शनिवार, रविवारी व सुट्टीच्या काळात लाखो पर्यटक भेट देवुन आनंद घेण्यासाठी येत आहेत.

अशा वातावरणात पावसाळी पर्यटनाचा आनंद काही औरच! आणि त्यातही धबधब्याखाली चिंब भिजायला कुणाला आवडणार नाही? त्यासाठीच पावसाळी पर्यटनासाठी त्यातल्या त्यात योग्य वातावरण आणि योग्य ठिकाणाचा शोध हौशी पर्यटकांकडून घेतला जातोय.

अशा या उष्ण वातावरणातही पावसाळी पर्यटनाचा आनंद घ्यायचा असेल तर कसारा घाटातील विहिगाव ( ता.शहापुर ) येथील “अशोका धबधबा” (Ashoka Waterfall) हा वन डे मॉन्सून डेस्टिनेशनच्या (One day Monsoon Destination) शोधात असणाऱ्या पर्यटकांसाठी एक उत्तम पर्याय आहेत !

नाशिक आणि मुंबई परिसरातील पर्यटक सध्या वन डे पिकनिकसाठी “अशोका” धबधब्याला मोठ्या संख्येने भेट देण्यासाठी येत आहेत मात्र येथेही पर्यटकांना येण्यासाठी बंदी आहे. निसर्गरम्य वातावरणातील हा अशोका धबधबा सध्या निसर्गप्रेमी पर्यटकांना चांगलाच आकर्षित करतांना दिसत आहे.

कसारा घाट परिसर हा पावसाळयात नेहमीच पर्यटकांसाठी सुखावह पर्यटनाचा आनंद देणारा परिसर आहे. गेले काही दिवस मनसोक्त बरसणाऱ्या पावसाने घाट परिसरात सर्वत्र हिरवेगार गालिचे आणि बहारदार हवा अनुभवायला मिळत आहे. पावसाळी पर्यटनस्थळाच्या शोधात असलेल्या निसर्गप्रेमींसाठी अशोका धबधबा हा उत्तम पर्याय असून मुंबई, ठाणे, कल्याण, वाशी, नवी मुंबई इथल्या पर्यटकांसोबतच नाशिक शहर आणि परिसर त्याचबरोबर स्थानिक इगतपुरी शहर आणि कसारा परिसरातील पर्यटकही या धबधब्यात मनसोक्त भिजण्याचा आनंद घेतांना दिसत आहेत.

इगतपुरीचे मुख्य आकर्षण (Attraction of the Igatpuri)

अप्पर वैतरणा धरण - २६ कि. मी. आहे. या ठीकाणी विजनिर्मितीचा मोठा प्रकल्प आहे. येथील धबधबा पाहण्यासाठी पावसाळ्या आनंद लुटण्यासाठी नाशिक, मुंबई, पुणे येथुन मोठ्या प्रमाणात पर्यटक गर्दी करत असतात. भंडारदरा - ३५ कि. मी., दारणा धरण ३० की. मी., खोडाळा - ३० कि. मी., सुंदरनारायण गणेश मंदीर देवबांध - ३५ कि. मी., याशिवाय कुलंग, अलंग, मलंग, कळसुबाई, रतनगड या उत्तुंग डोंगररांगा तसेच सांधन दरी, रंधा धबधबा या ठिकाणपासून जवळच आहे. कसारा घाटा जवळ भातसा रिव्ह्रर व्हैली, उंट दरी, पाच धबधबे, असे सुंदर ठिकाणे आहेत. कसारा घाटातील धुके अनुभवणे तर एक रोमांचकारी अनुभव असतो.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com