मोराने चक्क हेलिपॅडवर पिसारा फुलवला
मोरpeacocks

मोराने चक्क हेलिपॅडवर पिसारा फुलवला

मुंबई

कोरोनामुळे राज्यात लॉकडाऊन सुुरु आहे. यामुळे सर्वत्र शांतता आहे. नेहमी गजबजलेल्या असलेल्या महाराष्ट्राच्या राजभवनात शांतता आहे. मग त्याचा आनंद या मोराने घेतला. गुरुवारी सकाळी चक्क हेलिपॅडवर पिसारा फुलवला.

मोरा
मोरा

राज्यपालांचे निवासस्थान म्हणजेच मुंबईतील मलबार हिलवरील राजभवन. या राजभवनावर संध्याकाळी सर्व ‘पक्षीय’ सभा भरते. ते दृश्य पाहण्यासारखे असते. गुरुवारी सकाळी राजभवनातील मोर पिसार फुलवत, डोलवत ऐटीत फिरत होता.

मोरा
मोरा

विणीच्या हंगामात मोर नराला पिसारा असतो व विणीचा कालावधी संपताच तो झडून जातो. मोराचा विणीचा हंगाम पावसाळ्याच्या सुरुवातीला असतो. त्यामुळे साधारणपणे मे महिन्यापासून ते जून अखेरीपर्यंत लांबसचक पिसारा फिरवत मोर नाचत असतात.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com