Independence Day : १५ ऑगस्टला भारतासह ‘हे’ देशही साजरा करतात ‘स्वातंत्र्य दिवस’

Independence Day : १५ ऑगस्टला भारतासह ‘हे’ देशही साजरा करतात ‘स्वातंत्र्य दिवस’

मुंबई | Mumbai

देशभरात आज, १५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिन (75th Independence Day) साजरा होत आहे. इंग्रज भारताला स्वातंत्र्य १९४७ ला नाही तर १९४८ ला देणार होते. मात्र, महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांच्या ‘भारत छोडो’ (bharat chodo) या आंदोलनानंतर इंग्रजांनी १९४७ मध्येच भारताला स्वातंत्र्य दिले. दिडशे वर्षांच्या गुलामगिरीतून भारत मुक्त झाला आणि भारताने आपला पहिला स्वातंत्र्यदिन १५ ऑगस्ट १९४७ ला साजरा केला. परंतु आपण १५ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन साजरे करणारे एकटेच नाही. जगात आणखी देश आहेत, जे आज (१५ ऑगस्ट) आपल्याबरोबर स्वातंत्र्य दिन साजरा करत आहेत. जाणून घेउयात त्या देशांबद्दल..

दक्षिण कोरिया (South Korea)

South Korea
South Korea

दक्षिण कोरियाने १५ ऑगस्ट रोजी आपला स्वातंत्र्यदिन साजरा केला (south korea independence day). १५ ऑगस्ट १९४५ रोजी दक्षिण कोरियाला जपानकडून (Japan) स्वातंत्र्य मिळाले. अमेरिकन आणि सोव्हिएत (American and Soviet) सैन्याने कोरियाला जपानच्या बाहेर खेचले. दक्षिण कोरियामध्ये या दिवशी राष्ट्रीय सुट्टी (National holiday) असते.

उत्तर कोरिया (North Korea)

North Korea
North Korea

उत्तर कोरियाही (North Korea) १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतो (National Liberation Day of Korea). १५ ऑगस्ट १९४५ रोजी जपानच्या (Japan) ताब्यातून दोन्ही देशांना मुक्त करण्यात आले होते. उत्तर कोरियामध्ये १५ ऑगस्टला राष्ट्रीय सुट्टी असते.

बहरीन (Bahrain)

Bahrain
Bahrain

सौदी अरेबीयाशी (Saudi Arabia) किंग फहाद कॉजवे या पुलाशी (King Fahd Causeway bridge) जोडला गेलेला बहरीन देश हा १५ ऑगस्ट १९७१ मध्ये स्वातंत्र्य झाला. हा मध्यपूर्वेच्या पर्शियन आखातातील (Persian Gulf) एक छोटा द्वीप-देश आहे. हा छोटासा देश ब्रिटनच्या (Britain) गुलामगीरीत होता. कुवेत आणि इराक (Kuwait and Iraq war) यांच्या युद्धानंतर १९९० मध्ये बहरीन देशला संयुक्त राष्ट्रसंघाचे (United Nations) सदस्यपद मिळाले.

कांगो (Republic of Congo)

Republic of Congo
Republic of Congo

कांगोने (Congo) १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य मिळविले. हा देश १५ ऑगस्ट १९६० रोजी फ्रान्सच्या (France) तावडीतून मुक्त झाला. त्यानंतर कांगो रिपब्लिक बनले. १८८० पासून, कांगो फ्रेंचच्या ताब्यात होता.

लिक्टेंस्टाईन (Liechtenstein)

Liechtenstein
Liechtenstein

१५ ऑगस्ट १८६६ रोजी लिक्टेंस्टाईन (Liechtenstein) यांनी जर्मनीपासून (Germany) स्वातंत्र्य मिळवले. १९४० पासून हा १५ ऑगस्ट हा स्वातंत्र्यदिन म्हणून साजरा केला जात आहे. हा जगातील सर्वात लहान देशांपैकी एक आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com