Wednesday, April 24, 2024
HomeUncategorizedNavratri 2020 : बालमटाकळीची श्री बालंबिका देवी...

Navratri 2020 : बालमटाकळीची श्री बालंबिका देवी…

आजपासून नवरात्रोत्सवाला प्रारंभ होत आहे. यापुढील नऊ दिवस देवीच्या विविध रुपांची पूजा केली जाईल. आदिशक्तीचा जागर केला जाईल. नवरात्रोत्सव संपूर्ण देशभरात अगदी उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जातो. आपण जाणून घेऊयात अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील बालमटाकळीच्या श्री बालंबिका देवीबाबत…

माहूरच्या रेणुकामातेचे साक्षात रूप म्हणजे बालमटाकळीचे ग्रामदैवत व परिसराचे आराध्या दैवत असलेले श्री बालंबिका देवी. नवरात्रौत्सव व जानेवारीच्या पौष पौर्णिमेस भरणाऱ्या भव्य दिव्य यात्रेत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक दर्शनासाठी मोठ्या संख्येने येतात.

- Advertisement -

बीड व नगर जिल्ह्याच्या सरहद्दीवर असलेल्या बालमटाकळी गावात देवीच्या भव्य, शोभानिय मंदिराची वास्तू दिमाखात उभी आहे. ही वास्तू भाविकांचे लक्ष वेधून घेते. बालंबिका देवीचे महत्व व ज्वाजल्य पाहता देवीची महती ही सर्वदूर पसरली आहे. नवसाला पावणारी देवी, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असते. मंदिरापुढील एका बारवेतून या देवीचा जन्म झाला आहे. दगडी पाषाणातला शोभनीय तांदळा घेऊन देवीची मूर्ती बाहेर आली. देवीचा तांदळा हा अर्धमूर्ती आहे. चार फूट उंच व तीन फूट रुंद आहे. तळ हाताएवढे डोळे असून सुंदर चर्चित भाळी पिंपळपानाएवढे कुंकू आहे. दोन पदरी पाताळाने तो झुकला जातो. मूर्तीची उत्तराभिमुख प्राणप्रतिष्ठा विधिवत करण्यात आली आहे. शेजारी परशुराम व गणपतीची स्थापना करण्यात आली आहे.

देवीचे महत्व मोठे असल्याने गावातून किमान शंभराहून अधिक तरुण भाविक दरवर्षी विविध देवस्थानावरून ज्योत आणून नवरात्रोत्सव साजरा करतात. शंभराहून अधिक भाविक दरवर्षी मंदिरात चौफळा बांधून हातात काठी घेऊन श्रद्धेपोटी उपवास धरतात. मंदिरात दररोज सकाळ, संध्याकाळ महाआरती होते. या आरतीसाठी भाविकांची अलोट गर्दी असते. प्रसाद म्हणून भाविकांना फराळ दिले जाते.

- Advertisment -

ताज्या बातम्या