Tuesday, April 23, 2024
HomeUncategorizedPhoto Gallery : अंजनेरीचा 'तो' उलटा धबधबा आणि हनुमान तळे

Photo Gallery : अंजनेरीचा ‘तो’ उलटा धबधबा आणि हनुमान तळे

नाशिक | Nashik

अंजनीसुत हनुमानाचे जन्मस्थान समजले जाणारे अंजनेरीचे पावसाळ्यातील निसर्ग सौंदर्य काही औरच असते. करोनामुळे पर्यटनाला बंदी असल्याने यंदा पर्यटकांची पावले मात्र याठिकाणाकडे वळलेली नाहीत. दरवर्षी हजारोंच्या संख्येने पर्यटक याठिकाणी भेटी देतात, यंदा मात्र याठिकाणी शुकशुकाट आहे.

- Advertisement -

अंजनेरी पर्वताची उंची १ हजार ३०० मीटर म्हणजेच ४ हजार २६५ फूट इतकी आहे. पावसाळय़ात झाडांबरोबरच ढगही गर्दी करू पाहतात.

ढगांच्या या दाटीतून पुढे सरकत असतानाच असंख्य रानफुलेही लक्ष वेधून घेऊ लागतात. सोनकी, कवल्या, नागफणी आदी पावसाळी रानफुलांचा हा बहर पाहून येणाऱ्या प्रत्येकालाच याठिकाणाहून निघावेसे वाटत नाही.

जागोजागी फुललेल्या पांढऱ्या – जांभळ्या रंगातील नागफणीच्या फुले तर जणू आकाशातील चांदणेच खाली उतरल्यासारखा भास करवून देतात.

ढग आणि रानफुलांनी धुंद झालेली ही वाट बालेकिल्ल्याच्या पायथ्याशी येते. वाटेत विस्तीर्ण असे हनुमान तळे लागते. ढग-रानफुलांनी त्यालाही सौंदर्य बहाल केलेले असे चित्र सध्या याठिकाणी आहे.

विशेष म्हणजे याठिकाणी हवेचा वेग अधिक असल्यामुळे पश्चिमेकडून उंच पर्वतावरून वाहणारे धबधबे हवेच्या वेगात डोंगराच्या सपाटीकरण असलेल्या भागावर कोसळतात यामुळे याठिकाणी उलट्या धबधब्याचा आनंदही अनेकजण घेतात.

- Advertisment -

ताज्या बातम्या