Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedनाशिकमधील स्मार्ट रोडवर कुठेही करा पार्किंग

नाशिकमधील स्मार्ट रोडवर कुठेही करा पार्किंग

छायाचित्रे : सतिश देवगिरे

नाशिक

- Advertisement -

‘स्मार्ट सिटी’अंतर्गत नाशिकमधील पहिला स्मार्ट रोड अशोक स्तंभ ते त्र्यंबक नाका सिग्नल या १.१ किलोमीटर रस्त्यात झाला. हा स्मार्ट रोड झाला खरा पण प्रशासनाची उदासनता व नाशिककरांकडून होणाऱ्या नियमांची पायमल्लीमुळे स्मार्ट रोड आता कॉमन रोड झाला आहे. म्हणजेच कुठेही पार्किंग करा कोणी विचारणार नाही. मग कारवाई तर लांबच राहिली.

नाशिक मनपाने तब्बल १७ कोटी रुपये खर्च करून स्मार्ट रोड बनवला. त्यात अनेक प्रकारच्या सुविधा दिल्या. रस्त्याच्या दुतर्फा साडेसात मीटर वाहनासाठी जागा, दोन्ही बाजूला प्रत्येकी दीड मीटर सायकल ट्रॅकसाठी जागा ठेवण्यात आली.

यी चालाणाऱ्यांसाठी १.२ मीटरचे दुभाजक तयार केले गेले.विजेच्या आणि टेलिफोनच्या तारा, पावसाळी गटार साफसफाई या गोष्टींसाठी वारंवार रस्ता खोदला जाऊ नये म्हणून ठिकठिकाणी डक्ट तयार केले गेले. दिव्यांग, तसेच ज्येष्ठ नागरिकांना बसण्याची सोय, शौचालय, रिक्षा थांबे, बस थांबे अशा एक-ना-अनेक सुविधा आहेत.

युरोपियन देशातील रस्त्यासारखा चकाचक असणार स्मार्ट रोड आता कॉमन रोड झाला आहे. या स्मार्ट रोडवरील सायकल ट्रकला पार्किंग स्लॉट केला गेला आहे. वाहनधारकांची चारचाकी वाहने या ठिकाणी अनेकवेळा लावलेली दिसतात. तसेच फुटपाथवर दुचाकी वाहने लावलेली असतात. रिक्षाही थांब्याऐवजी कुठेही उभ्या असतात. यामुळे नाशिकमधील सूज्ञ नागरिकांना शहरात काही नियमावली आहे का? असा प्रश्न या ठिकाणाहून जातांना पडतो. कारण काहीही करा, कारवाई काहीच होत नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या