Monday, April 29, 2024
HomeUncategorizedPhoto Gallery : 'अनेक मुलं रडली, अनेकांचा मूड ऑफ, असा आहे शाळेचा...

Photo Gallery : ‘अनेक मुलं रडली, अनेकांचा मूड ऑफ, असा आहे शाळेचा पहिला दिवस…

नाशिक | प्रतिनिधी Nashik

कोविड-19 मुळे Covid-19 दीड वर्षांच्या प्रतिक्षेनंतर आजपासून जिल्ह्यातील प्राथमिक शाळांची Primary Schools घंटा वाजली. सकाळी लवकर उठून अनेक विद्यार्थ्यांना पालकांनी शाळेत सोडण्यासाठी गर्दी केली होती….

- Advertisement -

आज नाशिक शहरातील इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या तर ग्रामीण भागातील इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळा अधिकृतपणे सुरु झाल्या आहेत. शहरात सातवीपर्यंतच्या 405 शाळांमध्ये एक लाख 85 हजार 279 विद्यार्थी शिक्षण घेत असून या शाळा सुरु करण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला

शहरातील 60 टक्के पालकांनी शाळा सुरु करण्यास परवानगी दिली आहे. ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या 3 हजार 263 शाळा आहेत. तसेच खासगी शिक्षण संस्थांच्या 663 आणि इंग्रजी माध्यम व इतर विभागांच्या अशा एकूण 5 हजार शाळा आहेत. या शाळांची माहिती मागवण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकारी सूरज मांढरे Collector Suraj Mandhareयांनी शाळा सुरु करण्यास परवानगी दिली आहे.

शाळा सुरू करण्यापूर्वी शाळांनी पूर्ण तयारी केली असून, विशेषत: प्राथमिक शाळांनी वर्ग सॅनिटायझेशन, स्वछता, फळ्यांवर स्वागताचे संदेश सजले आहेत. शहरातील काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांवर पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. तर काही शाळांनी ढोल-ताश्यांच्या गजरात विद्यार्थ्यांचे स्वागत करण्याचा निर्णय घेतला आहे.

महापालिका हद्दितील एकूण शाळा- 405

एकूण विद्यार्थी- 1,85,279

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा – 3263

खासगी शिक्षण संस्थांच्या प्राथमिक शाळा – 663

ग्रामीण भागातील इंग्रजी माध्यम व इतर शाळा – 1400 (अंदाजे)

गुलाबपुष्प देऊन झाले विद्यार्थ्यांचे स्वागत

विद्यार्थी शाळेत दाखल होत असताना गुलाबपुष्प देऊन झाले विद्यार्थ्यांचे स्वागत शिक्षकांकडून करण्यात आले. यावेळी प्रत्येक विद्यार्थ्याचे तापमान तपासण्यात आले व प्रत्येकाच्या हातावर सॅनिटायझर देऊन हात निर्जंतुक केल्यानंतर विद्यार्थ्यांना वर्गात प्रवेश देण्यात आला. मास्क लाऊन प्रत्येक विद्यार्थी जागेवर बसलेला दिसून आला.

प्रार्थना वर्गातच झाली

बऱ्याच महिन्यांनी पूर्णस्वरुपात शाळा आज भरलेली दिसून आली. विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश दिल्यानंतर प्रार्थनाही वर्गातच झाली. इतर वेळी सर्वकाही ऑनलाईन झाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना आजचा दिवस तसा वेगळा वाटत आहे. पहिलीचे काही विद्यार्थी जावं की नाही या मूडमध्येही दिसून आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या