Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedPhoto Gallery : परीक्षाही घेतली अन् दंडही वसूल केला; विनाहेल्मेट धारकांवर कडक...

Photo Gallery : परीक्षाही घेतली अन् दंडही वसूल केला; विनाहेल्मेट धारकांवर कडक कारवाई

नाशिक | प्रतिनिधी nashik

आजपासून नाशिक शहरात हेल्मेट सक्ती (compulsory helmet in nashik) कडक करण्यात आली आहे. आता परीक्षेऐवजी थेट दंड वसूल करण्यास सुरुवात झाली आहे. जे कुणी हेल्मेट वापरत नाहीयेत त्यांना परीक्षेलाही बसवण्यात आले. यानंतर पोलिसांनी दंडही वसूल केला….(thirteen thousand fine collect from 26 without helmet bike riders in khutwadnagar police station)

- Advertisement -

हेल्मेट नाही घालणार तर तुम्हीच मरणार, हेल्मेट तुमच्या फायद्यासाठी आहे. बाकीचे वादविवाद न घालता हेल्मेटसक्तीला सहकार्य केले पाहिजे. असे सांगत पोलीस आयुक्त दीपक पांडे (Police Commissioner Deepak Pandey) यांनी खुटवडनगर येथील पोलीस चौकीला (Khutwadnagar police chauki Nashik) भेट देत येथील हेल्मेटसक्तीबाबत माहिती जाणून घेतली.

याप्रसंगी वाद घालणाऱ्या एका मुलाला त्यांना अतिशय मवाळ भाषेत सांगत हेल्मेट तुमच्या कसे फायद्याचे आहे त्याची जाणीव करून दिली. कुठलेही वादविवाद न करता पोलिसांनी लागू केलेले नियम पाळा अन्यथा दंड भरा अशी भूमिका घेतल्यामुळे जवळपास २६ वाहनचालकांना परीक्षेलाही बसवले आणि त्यांच्याकडून तब्बल १३ हजार रुपयांचा दंडही वसूल केला.

नो हेल्मेट नो पेट्रोल, नो हेल्मेट नो कोऑपरेशन, नो हेल्मेट नो एन्ट्री अशा वेगवेगळ्या मोहिमांच्या माध्यमातून पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी नाशिकमधील हेल्मेट सक्ती करण्याबाबत प्रयत्न केले. मात्र, अजूनही नाशिकमध्ये अनेक भागातून विनाहेल्मेट दुचाकीस्वार दुचाकी दामटवत असल्याचे दिसून येते. त्यामुळे आजपासून हेल्मेट सक्ती अधिक कडक करण्यात आली असून दंड वसूल करण्यास सुरुवात झाली आहे.

तर दुसऱ्यांदा विनाहेल्मेट आढळून आल्यास एक हजार रुपयांचा दंड आणि पुढील तीन महिन्यांसाठी परवाना रद्द करण्यात येणार असल्यामुळे हेल्मेट सक्तीचा चांगला परिणाम जाणवण्याची शक्यता वर्तविली जाते आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या