Friday, April 26, 2024
HomeUncategorizedआपत्कालीन परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

आपत्कालीन परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

नाशिक | प्रतिनिधी

सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीने नाशिक महापालिकेच्या मुख्यालयात व सहाही विभागीय कार्यालयात आगप्रतिबंधक उपाययोजना (अग्निशमन यंत्रणा) व विद्युत उपकरणे हाताळणी बाबत प्रशिक्षण देण्यात येत आहे. तीन दिवस हे प्रशिक्षण दिले जाणार असल्याची माहिती मुख्य अग्निशमन अधिकारी संजय बैरागी यांनी दिली…

- Advertisement -

नाशिक महानगरपालिकेचे मुख्यालय व सहा विभागीय कार्यालयांमध्ये सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने आयुक्त कैलास जाधव यांच्या आदेशाने अग्निशमन यंत्रणा व विद्युत उपकरणे यांची हाताळणी व त्याबाबतची सुरक्षितता या संदर्भात प्रशिक्षण देण्याच्या दृष्टीने विद्युत विभाग व अग्निशमन विभाग यांच्या वतीने कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आलेले आहे.

या अनुषंगाने मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन येथील विविध कार्यालयांमधील अग्निशमन यंत्रणा व विद्युत उपकरणे हाताळणे बाबत अधिकारी, कर्मचारी,शिपाई व सुरक्षारक्षक यांना प्रशिक्षण देण्यात आले.

तसेच या सर्व यंत्रणेची माहिती तसेच जनजागृती करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम हाती घेण्यात आला असून मनपाच्या मुख्यालयासह पुढील दोन दिवसात दि.२२ जानेवारी २०२१ पर्यंत मनपाच्या पूर्व, पश्चिम, पंचवटी, नवीन नाशिक, सातपूर व नाशिक रोड या सहाही विभागीय कार्यालयांमध्ये प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

अतिरिक्त आयुक्त डॉ.प्रवीण अष्टीकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण दिले जात असल्याची माहिती मुख्य अग्निशमन अधिकारी संजय बैरागी यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या