त्यांच्यासोबत दिवाळी साजरी केली अन् आयुष्याचं सार्थक झालं

त्यांच्यासोबत दिवाळी साजरी केली अन् आयुष्याचं सार्थक झालं

नाशिक | प्रतिनिधी Nashik

ऐतिहासिक वारसा लाभलेल्या गडकिल्ल्यांचे संवर्धन करता-करता येथील अतिदुर्गम भागात (Tribal area in Baglan) वास्तव्यास असलेल्या रहिवाशांची काळजी अनेक सामाजिक संस्था घेत आहेत. यातीलच एक संस्था म्हणजे सह्याद्री मित्र परिवार (Sahyadri Mitra Parivar). यांनी यंदाही दिवाळीनिमित्त येथील आदिवासी बांधवांना भेटवस्तू देत त्यांच्यासोबत दिवाळी साजरी केली आहे....(Celebrating diwali with tribal peoples)

आनंदाची दिवाळी (Happy Diwali 2021) या संकल्पनेवर आधारित दिवाळी फराळ व भेट याप्रसंगी देण्यात आली. आपण गडांचे देणे लागतो, त्यामुळे इतर दिवशी गडांचे संवर्धन कार्य तर सुरू असतेच. त्याच जोडीला आपण समाजाचेही देणे लागतो म्हणुन दर वर्षी दिवाळी भेट देण्याची ही परंपरा या संस्थेने सुरु ठेवली आहे.

नाशिक जिल्ह्यातील बागलाण (Baglan) तालुक्यातील मुल्हेर (Mulher) गडाच्या पायथ्याशी असलेल्या वाडीमध्ये तसेच चौल्हेर गडाजवळील गव्हाळी या दुर्गम वाडी मध्ये दिवाळी भेट देण्यात आली.

यात गृहपयोगी साहित्य, ब्लँकेट, चटई, सौरदिवे, मेडीकल किट, फराळ, कपड़े भेट म्हणुन देण्यात आले. भेट घेतल्यानंतर आदिवासी बांधवांच्या चेहर्‍यावर आनंद दिसत होता.

त्यांच्या आशिर्वादाने कृतकृत्य झाल्याची भावना झाली होती. या वाटपा वेळी मुंबई येथील संजय भाट, सुशील शिवलकर, प्रश्नांत अधाटराव, चेतन पाटील, प्रीतम गवळी, चेतन मुंज, संजय मोरे, निवृत्ती जाधव, स्वप्नील नागवेकर (बेळगाव), सोम ढवळे आणि नील मयेकर यांचा समावेश होता. अनोख्या दिवाळी भेटसाठी गडसेवकचे रोहित जाधव व अब्दुल बोहरी यांनी परिश्रम घेतले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com