Friday, April 26, 2024
HomeUncategorizedPhoto Gallery : नाशिकला झेंडूंच्या फुलांचे कोंदण; बाजारपेठेत मागणी वाढली

Photo Gallery : नाशिकला झेंडूंच्या फुलांचे कोंदण; बाजारपेठेत मागणी वाढली

नाशिक | प्रतिनिधी Nashik

हिंदु सणांचा राजा म्हणुन ज्याकडे बघितले जाते ती दिवाळी आज लक्ष्मी पुजनाच्या निमित्ताने साजरी होत आहे. (Diwali Celebration in Nashik) लक्ष्मी पुजनाच्या (Laxmipoojan) निमित्ताने बाजारातील मंदीमुळे सारी मरगळ दुर झाली असुन शहरात चैतन्यमय व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. बाजारातील झुंबड पाहुन कोरोनाचा मागमुसही कोठेही दिसला नाही. लक्ष्मी पुजन आणि झेंडूंच्या फुलांची सजावट हे समीकरण असल्याने लाखो रुपयांची उलाढाल आज झेंडूंच्या फुलात झाली….

- Advertisement -

झेंडुं व शेवंतीच्या फुलांना विशेष महत्त्व असल्याने शहरातील फुल बाजार (Flower Market), गोदाकठ (Godakath), रविवार कारंजा (Ravivar Karanja), टिळक पथ (Tilak Peth), नाशिकरोडचा बिटको चौक (Nashikroad Bitco Chawk), नवीन नाशिक मधील शिवाजी चौक त्रिमुर्ती चौक, पाथर्डीफाटा, गंगापुर नाका, इंदिरानगर, सातपुर या ठिकाणी झेंडूच्या खरेदी विक्रीसाठी मोठी गर्दी झाली.

यंदा मोठ्या प्रमाणात बाजारात झेंडूची फुले विक्रीसाठी दाखल झाली. सुरवातीला दिडशे रुपये कॅरेटचा भाव होता. शंभर रुपये शेकडा फुल विकले जात होते. शेवंतीची फुलेही 50 व 80 रुपये किलोने अनेकानी विकत घेतली. दुपार नंतर जसजशी फुलांची आवक वाढत गेली तसतसा भावही खाली वर होत होता.

व्यापारी वर्ग लक्ष्मी पुजन करतांना शक्यतो खर्च करतांना हात आखडता घेत नसल्याने फुल विक्रेत्यांच्या हाती चांगला पैसा खेळला. झेंडूच्या फुलांसोबतच आंब्याची डाहाळे, साळीच्या लाह्या, बत्ताशे, पाच फळे, लक्ष्मीची मुर्ती, फोटो तसेच वह्यां व पुजा साहीत्य, शेवंतीची वेणी, विक्रेत्यांची आज दिवसभर धमाल दिसली.

सकाळपासुन हे विक्रेते सज्ज झाले होते. मुर्ती 70 रुपयांत लक्ष्मीचा फोटो 20 रुपयांपासुन 200 रुपयां पर्यंत होता. वह्या 35 रुपयांपासुन शंभर रुपयांच्यापर्यंत तर पाच फळे तीस रुपयाला या दराने विकले गेले.

दुचाकी, चारचाकी ची शोरुम सज्ज

दिवाळी निमित्ताने खरेदीचा मुहूर्त साधण्यासाठी शहरातील दुचाकी चारचाकी वाहनांच्या शोरूम तसेच गृहोपयोगी वस्तू व सोने चांदीची बाजार पेठ सज्ज झाल्या आहेत. खरेदीसाठी बाजारात अनेक ऑफर्स देखील आहेत. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी खास स्टॉल लावण्यात आले आहेत. त्या मिठाई विक्रेत्यांनी विविध प्रकारच्या मिठाई मंडप उभारुन मांडुन ठेवल्याने दिवाळीचा आनंद द्विगुणीत झाला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या