फोटो स्टोरी : सतीश देवगिरे

नाशिकमधील अल्हादायक वातावरणच्या प्रेमात इंग्रजीही पडले होते. यामुळे ब्रिटीश राजवटीत नाशिकला सामरीक महत्त्व प्राप्त होते. थंड प्रदेशातील ब्रिटीशांनी भारतातील सर्वोत्तम वातावरण असलेल्या ठिकाणांची एकतर आर्टिलरी कॅम्प म्हणून किंवा हिल स्टेशन म्हणून निवड केली.

देवळाली कॅम्प हे देशातील प्रमुख सामरीक केंद्र व ब्रिटीशांचे सेकंड होम म्हणून प्रस्थापित झाले. निसर्गप्रेमी ब्रिटीशांनी अंजनेरी व त्र्यंबकेश्वर भागातील जंगल हे संरक्षित ठेवण्याची तरतूद केली.

नाशिककर तर या वातावरच्या प्रेमात पडणारच ना. सकाळच्या गुलाबी थंडीचा आनंद घेण्यासाठी नाशिककर मोठ्या संख्येने बाहेर पडू लागले आहेत. फिरणे, व्यायाम, सायकलिंगचा आनंद नाशिककर घेत आहेत.