विविधरंगी पतंग आणि वैविध्यपूर्ण आकारांनी सजले 'नाशिक'

विविधरंगी पतंग आणि वैविध्यपूर्ण आकारांनी सजले 'नाशिक'

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नाशिककरांना आता वेध लागले आहेत ते येणाऱ्या मकर संक्रांतिचे. (Makar Sankranti festival) संक्रांतिचा उत्सव साजरी करण्यासाठी विविधरंगी पतंगांनी बाजारपेठ सजली आहे. पर्यावरणाला हानी न पोहोचविणाऱ्या पारंपरिक कागदी पतंगांचीही मागणी वाढणार असल्यामुळे त्याही पतंग तयार करण्यास सुरुवात झाली आहे. (Eco friendly kite festival) एकीकडे पतंग तयार होत असतानाच मांजासाठीदेखील लगबग सुरु झाली आहेत....

यंदा वैविध्यपूर्ण आकारातील पतंगांना चांगली मागणी आहे. शहरातील दुकाने विविध रंगाच्या आणि आकाराच्या पतंगांनी फुलली आहेत.

पतंगांमध्ये प्लास्टिक, कागदी आणि कापडी असे पर्याय आहेत. गरूड, फुलपाखरू, वाघ, स्पायडर मॅन, छोटा भीम, डोरेमॉन, अँग्री बर्ड, सुपरमॅन, टॉम अ‍ॅँड जेरी, हत्ती, फिश, डॉग, मोटू पतलू, रेनबो, आयर्नमन, परी डॉल्फिन यांची चित्र असणाऱ्या पतंगांना मुलांची मोठी पसंती मिळत असल्याची माहिती पतंगविक्रेत्यांनी देशदूतशी बोलताना सांगितले.

२० टक्क्यांनी वाढले दर

दरवर्षीपेक्षा यंदा पतंगाचे दर २० टक्क्यांनी वाढलेले आहेत. गेल्या वर्षी डोरेमोन २५० रुपयाला मिळत होता यंदा या पतंगाची किंमत ३०० रुपये झाली आहे. हत्ती ४००, ड्रगन ५००, फीश ४०० रुपयांना विक्री केली जात आहे. तर स्पायडर मन पतंग गेल्या वर्षी विक्री २०० रुपयांना होती. यंदा मात्र या पतंगाची किंमत वाढली असून २५० रुपये इतकी झाली आहे. डॉग पतंग १६० रुपयांना विक्री होत होता यंदा हा पतंत ४० रुपयांनी महागला आहे. मोटूपतलू पतंग मात्र महागलेला नाही.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com