नाशिक | प्रतिनिधी

नाशिक शहरात गेल्या तीन ते चार दिवसांपासून पारा १५ अंशांच्या खाली आला आहे. वातावरणात गारठा निर्माण झालेला असतानाच आज सकाळी नाशिक शहरावर धुक्याने दुलई पांघरलेली दिसून आली. सकाळी आठ वाजले तरीदेखील सूर्यनारायणाचे दर्शन झाले नाही तसेच रस्त्यावर दुचाकी चारचाकी लाईट सुरु करून प्रवास करताना दिसून आले.

नाशिकसह परिसरात हवामान खात्यामुळे तुरळक पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. यामुळे वातावरणात अमुलाग्र बदल झाले आहेत.

पहाटे योगा, जॉगिंग, सायकलिंग, प्राणायाम, व्यायाम करणारे तसेच नोकरीसाठी बाहेर पडलेल्यांना धुक्यातून वाट काढवी लागली.

गेल्या काही दिवसांपासून थंडीचा जोर वाढला असला तरी धुके नव्हते. मात्र आज अचानक शहराला धुक्याने कवेत घेतल्याने अल्हाददायक वातावरण नाशिककरांना अनुभवायला मिळाले.

(सर्व फोटो : दिनेश सोनवणे)