Saturday, April 27, 2024
HomeUncategorizedPhoto : लालबागच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा संपन्न, पाहा फोटो

Photo : लालबागच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा संपन्न, पाहा फोटो

मुंबई | Mumbai

ही शान कोणाची, लालबागच्या राजाची, लालबागच्या राजाचा… विजय असो, या जयघोषांनी पुन्हा एकदा लालबागचा परिसर दणाणून निघणार आहे.

- Advertisement -

तब्बल दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर यंदा लालबागचा राजा दिमाखात मंडपात विराजमान होणार असून गेल्या वर्षी रद्द करण्यात आलेला उत्सव यंदा मात्र कोविडच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करून साजरा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने घेतला आहे.

आज, मंगळवारी पहाटे सहा वाजता लालबागच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा पार पडला. करोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत साधेपणाने आणि सुरक्षितपणे लालबागच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा संपन्न झाला.

लालबागच्या राज्याच्या दर्शनाला होणारी गर्दी पहाता लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने पाऊल पूजन सोहळा जाहीर न करता हा सोहळा केला. त्यामुळे गणेशभक्तांची होणारी गर्दी टाळता आली.

लालबागच्या राजाचा यावर्षीचा ८८ वा गणेशोत्सव यंदा मंडळातर्फे शुक्रवार दि. १० सप्टेंबर २०२१ ते रविवार दि. १९ सप्टेंबर २०२१ या कालावधीत साजरा होणार आहे.

दरवर्षी लालबागच्या राजाच्या पाऊल पूजनालाही गणेशभक्तांची मोठी गर्दी होते यंदा मात्र कोविड १९ ससंर्ग निर्बंध नियमांमुळे मंडळाने गर्दी टाळण्यासाठी ही खबरदारी घेतली होती. आता सर्व गणेशभक्तांना वेध लागलेत ते लालबागच्या राजाच्या स्थापनेची आणि दर्शनाची.

- Advertisment -

ताज्या बातम्या