Sunday, April 28, 2024
HomeUncategorizedदुचाकी रायडर्सच्या चित्तथरारक कसरती; पाहा फोटो

दुचाकी रायडर्सच्या चित्तथरारक कसरती; पाहा फोटो

नाशिक |प्रतिनिधी Nashik

अत्यंत अटीतटीच्या लढतील एम आर एफ सुपरक्रॉस स्पर्धेत टीव्हीएस रेसिंग टीमचा सीडी जिनान याने नाशिकच्या पहिल्या स्पर्धेत विजेतेपद पटकावून आपले नाव कोरले. नुकत्याच नाशिकमध्ये झालेल्या एमआरएफ मोग्रीप एफएमएससीआय राष्ट्रीय सुपरक्रॉस विजेतेपद स्पर्धेत नाशिककरांची डोळ्याची पारणे फेडली….(MRF Super cross national championship)

- Advertisement -

एस एक्स १ (SX1) या विदेशी बनावटीच्या मोटारसायकलसाठीच्या गटात अटीतटीची लढत बघायला मिळाली असून टीव्हीएस रेसिंग टीमच्या (TVS Racing team) स्पर्धकांचा सहभाग या गटातील रंगात वाढवणार ठरला.

सर्वोत्तम दुचाकी रायडर्सचे कसब यावेळी बघावयास मिळाले. यामध्ये विदेशी बनावटीच्या गाड्या तसेच देशी गाड्यांचा सहभाग होता. ही स्पर्धा एकूण सहा गटात संपन्न झाली असून सुमारे १०५ स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदविला होता.

(सर्व छायाचित्रे : सतिश देवगिरे, देशदूत नाशिक)

स्पर्धेचे आकर्षण

न्यूझीलंड (New Zealand) येथून आलेले जो डफील्ड व ऑस्ट्रेलिया (Austrelia) येथून आलेले शॉन वेब याचे चित्तथरारक प्रात्याक्षिकाने नाशिककरांच्या डोळ्याचे पारणे फेडले. आकाशात उंच गाडी उडवून चित्तथरारक कसरती या वेळेस बघायला मिळाल्या. सुपरक्रॉस हा कृत्रिमरित्या बनवलेल्या मार्गावर मोटारसायकल साठी घेण्यात येणारा स्पर्धा प्रकार असून या मार्गावर वाकदार वळणे व छोटे मोठे उंचवटे बनवलेले असतात. उंचवट्यावरून उंचच उंच उड्या मारत जाणारे स्पर्धक हा मोठा आकर्षणाचा भाग असतो.

दिवसेंदिवस या स्पर्धेला प्रेक्षकांच्या उपस्थितीत लक्षणिय वाढ दिसून येत आहे .या मार्गावर १२ जम्पस , १ टेबलटॉप व १ कट टेबलटॉप होते. तुलनात्मकरित्या बराच वेगवान ट्रॅक बनविलेला असल्याने स्पर्धकांचे कसब पणाला लागली होती.

प्रेक्षकांना मात्र येथे नेत्रदीपक स्पर्धेचा थरार बघायला मिळाला. स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे

क्लास १ एस एक्स २, ५०० सी सी पर्यंत : सी डी जिनान प्रथम , ऋग्वेद बारगुजे द्वितीय , महेश व्ही एम तृतीय , प्रज्वल व्ही चतुर्थ , ईशान शानबाग पाचवा

क्लास २ एस एक्स २ , ५०० सी सी पर्यंत : अजय श्रीनिवास प्रथम , जितेंद्र सांगावे द्वितीय ,दवायने जोहान्स तृतीय , मानेकांडन के चतुर्थ, भूमिका ललवाणी पाचवा क्लास ३ नोव्हाईस २६० सी सी पर्यंत बंटी एलंग जेरवा प्रथम, अभि एस नाथ द्वितीय , अरुण टी तृतीय , सचिन डी चतुर्थ , करणकुमार एम पाचवा क्लास ४ नोव्हाईस

२६० सी सी पर्यंत : सी डी जिनान प्रथम , पिंकेश ठक्कर द्वितीय , रुसले जोस्य तृतीय , शेख जिब्रान चतुर्थ , राजेश स्वामी पाचवा क्लास ५ इंडियन एक्सपर्ट २६० सी सी पर्यंत : सचिन डी प्रथम , असरुद्दिन एस द्वितीय , करणकुमार एम तृतीय , अभि एस नाथ चतुर्थ , नटराज आर पाचवा क्लास ६ प्राव्हेट एक्स्पर्ट

२६० सी सी पर्यंत :अरुण टी प्रथम , असरुद्दिन एस द्वितीय , अभि एस नाथ तृतीय , आर सबरीश चतुर्थ , करण कुमार पाचवा क्लास ७ जुनिअर एस एक्स २५० सी सी पर्यंत : श्लोक घोरपडे प्रथम , जितेंद्र सांगावे द्वितीय , अनस्त्या पोळ तृतीय , सुजन जे चतुर्थ क्लास ८ जुनिअर एस एक्स १०० सी सी पर्यंत :अक्षत हुपाले प्रथम , जिना शेख द्वितीय , भैरव सी तृतीय , यश शिंदे चतुर्थ.

- Advertisment -

ताज्या बातम्या