नाशिक l Nashik (प्रतिनिधी)
लाडक्या गणरायाचे आगमन अवघ्या दहा दिवसांवर येवून ठेपले आहे. या निमित्ताने सर्वत्र जोरदार तयारी सुरु झाली आहे.
येत्या (दि. २२) रोजी बाप्पांचे आगमन होणार असून शहरातील महत्वाच्या बाजारपेठेत नव चैतन्य संचारले आहे.
करोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून बाजारपेठातील सर्व व्यवहार ठप्प झाले होते. परंतु आता गणेशोत्सवा निमित्त बाजारपेठा पुनः फुलू लागल्या आहेत.
गणेशोत्सवा निमित्त लागणारे सजावटीसाठीचे साहित्य उपलब्ध झाले आहे. यात मुख्यतः फुलांच्या माळा, विद्यत दिवे, रंगी-बेरंगी पट्ट्या, मंदिर, मखर, झिरमिळ्या, पताके, कागदी फुल, विविध प्रकारचे देखावे या वस्तूंचा समावेश आहे.