Photo Gallery : झोंबणाऱ्या थंडीला भारी पडला 'मकरसंक्रांती' उत्सव

Photo Gallery : झोंबणाऱ्या थंडीला भारी पडला 'मकरसंक्रांती' उत्सव

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शहरासह जिल्ह्यात मकर संक्रांत (Makarsankrant) आज श्रद्धेने, उत्साहाने आणि परंपरेनुसार साजरी करण्यात आली. मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवण्याची परंपरा यंदाही कायम राहीली. येवला (Yeola) आणि नाशिकमध्ये (Nashik) मकर संक्रांतीनिमित्त तरुणाई पतंग उडविण्यात गर्क असल्याचे चित्र होते...

तसेच येवल्याच्या पतंग महोत्सवाला अनेक वर्षांची परंपरा असल्याने येवल्यात संक्रांतीचा सण उत्साहात साजरा झाला. पतंगोत्सवाला खंड पडू दिला नाही. एकीकडे झोंबणारी थंडी अन् दुसरीकडे वाढत चाललेले करोनाचे रुग्ण (Corona) यामुळे गोड सणाच्या आनंदावर थोडे विरजण पडले होते. मात्र जशी संधी मिळेल तसा आनंदही साजरा झाला.

सकाळपासून पतंग उडविणार्‍यांची गर्दी फारशी दिसली नाही. सुर्यनारायणाचे दर्शन दुपारनंतर झाले. त्यामुळे अनेकांनी दुपारनंतर पतंग उडविण्याचा शौक पूर्ण केला. पतंगाची खरेदी करण्यासाठी गुरुवारपासूनच बाजार भरलेला होता. वाहनांची मोठी वाहतूक कोंडी (Traffic Jam) रविवार कारंजा, मेनरोडसह नवीन नाशिक, पंचवटी, सातपूर आणि नाशिकरोड मधील मुख्य मार्केट परिसरात झाली होती.

दुपारी नाशकात डीजेचा दणदणाट ऐकू येताच पोलिसांनी (Police) थेट ’गच्चीवर’ जाऊन कारवाई केली. नव दाम्पत्यांनी पहिला संक्रांत सण मोठ्या उत्साहात साजरा केला. सोन्या चांदीच्या भेट वस्तू जावयांना दिल्या गेल्या. त्यामुळे सराफ बाजारात चांगली उलाढाल झाली.

Related Stories

No stories found.