Sunday, April 28, 2024
HomeUncategorizedMaharashtra Floods : पूरग्रस्त भागात मदत व बचाव कार्य वेगाने सुरू, पाहा...

Maharashtra Floods : पूरग्रस्त भागात मदत व बचाव कार्य वेगाने सुरू, पाहा फोटो

मुंबई | Mumbai

संपूर्ण राज्यात सध्या पावसाचे थैमान सुरू असून अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे.

- Advertisement -

सततच्या पावसामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये नद्या धोका पातळी ओलांडून वाहत आहेत. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात पावसाने धुमाकूळ घातला आहे. पूरस्थिती निर्माण झाली आहे.

रस्ते, रेल्वे मार्ग येथे पाणी साचल्यामुळे वाहतूक मंदावली आहे. राज्यात काही ठिकाणी दरडी कोसळून दुर्घटना घडल्या आहेत.

ठिकठिकाणी एनडीआरएफ स्थानिक पोलीस, अग्नीशमन दल मदतकार्य करत आहेत.

कोकणात नौदल मदतकार्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. नौदलाची सात पथके रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात मदतकार्य करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या