खान्‍देशचा कानुबाई उत्सव
फोटो गॅलरी

खान्‍देशचा कानुबाई उत्सव

करोनामुळे पडले आनंदावर विरजण

Rajendra Patil

धुळे - प्रतिनिधी Dhule

श्रावण महिना आला म्हणजे सर्वत्र कानुबाई मातेचा उत्सव थाटामाथाट साजरा केला जात असतो. खान्देशात कानुबाई मातेवर प्रत्येक भक्ताची खूप श्रद्धा, निष्ठा व विश्वास आहे.

कानुबाईचा उत्सव करायचं म्हटलं म्हणजे एक वेगळीच ऊर्जा शरीरात येते. घरोघरी कानुबाई उत्सव साजरा होत असल्याने आठवडाभरापासूनच घरात तयारी सुरू होते. त्यात थाट असतो, रोट असतात, मातेचा थाट भरला जातो त्यात दूध मोगराचा नैवेद्य मातेच्या चरणी अर्पण केला जातो.

कानुबाईची सजावट, सगळ्या पूजा विधीची तयारी, सोनार, वाणी, सुतार, कुंभार आणि आंब्याच्या झाडाखाली जाणे, थाट भरणे, रात्री गाणे म्हणणे, फुगड्या खेळणे, नाचाणे आदी आनंदोत्सव साजरा होतो.

उत्सवा दरम्यान कानुबाईचे रूप सर्वांचे मन मोहून टाकणारे असते. चेहऱ्यावर सूर्या सारखे तेज, नाकात नथ, गळ्यात दागिने, मोगऱ्याच्या फुलांमध्ये वेढलेली कानुबाई, पायात पैंजण, हातात हिरव्या बांगड्या, साडी, मुकुट असं वाटतं जणू साक्षात कानुबाई उभी आहे. यावर्षी मात्र कोरोना महामारीने सर्वकाही बंद झाले आहे. सगळं जग संकटाशी लढत आहे. अश्या परिस्थितीत कानुबाई मातेचा उत्सव अगदी साध्या पध्दतीने साजरा होत आहे.

यावर्षी मात्र कोरोना महामारीने सर्वकाही बंद झाले आहे. सगळं जग संकटाशी लढत आहे. अश्या परिस्थितीत कानुबाई मातेचा उत्सव अगदी साध्या पध्दतीने साजरा होत आहे.

कानुबाई मातेच्या चरणी प्रार्थना करत आहेत की, माते ह्या कोरोनाच्या महाभयंकर संकटातुन सर्वाना लवकर बाहेर काढ व सगळं पहिल्या सारखं सुरळीत होऊ दे व जे आजाराशी सामना करत आहे त्याना आर्थिक, शारीरिक व मानसिक पाठबळ दे व ह्या आजारातून ठणठणीत बरं होऊन परत नव्याने उभं राहण्याची शक्ती दे, डॉक्टर, नर्स, राजकीय नेते, पोलीस बांधव, सीमेवरचे जवान व सामाजिक मदत करणाऱ्या सर्व लोकांची काळजी घे व लढण्याची शक्ती दे तसेच आजारावर लवकर लस तयार करण्यात भारत वासीयांना यश मिळू दे अशी प्रार्थना भक्त करत आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com