Kalpana Chawla Death Anniversary: हरिणायाची मुलगी ते नासाची अंतराळवीर

'अवकाशपरी' कल्पना चावला यांचा आज स्मृतीदिन
Kalpana Chawla Death Anniversary: हरिणायाची मुलगी ते नासाची अंतराळवीर

कल्पना चावला (Kalpana Chawla) ह्या व्यक्तीला कोण नाही ओळखत. कल्पना चावला या भारताची पहिली अंतरिक्ष महिला. अवकाशात प्रवेश करण्याचे स्वप्न उराशी बाळगून त्यासाठी सातत्याने मेहन करणाऱ्या 'अवकाशपरी' कल्पना चावला यांचा आज स्मृतीदिन(Kalpana Chawla Death Anniversary). कल्पना चावला यांच्या स्मृतीदिना निमित्ताने त्यांच्या जीवनाविषयी आपण जाणून घेणार आहोत.

कल्पना चावला यांचा जन्म हरयाणा राज्यातील कर्नालमध्ये झाला. त्यांचं शालेय शिक्षण १९७६ साली टागोर स्कूलमध्ये झाले. त्यांनी Punjab Engineering College, चंडीगढ येथून वैमानिकी अभियांत्रिकी या विषयात १९८२ साली पदवी प्राप्त केली.

त्यानंतर टेक्सास विद्यापीठातून Aeronautical Engineering या विषयात १९८४ साली पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी १९८८ मध्ये University of Colorado Boulder अवकाश वैमानिकी अभियांत्रिकी या विषयात PhD पदवी मिळविली.

कल्पना यांचा विवाह फ्रान्सचे वैमानिक प्रशिक्षक ज्याँ पीर हॅरीसन (Jean-Pierre Harrison) यांच्याशी झाला. त्यानंतर त्यांनी अमेरिकेचे नागरिकत्व स्वीकारले. त्यानंतर The National Aeronautics and Space Administration (NASA) संशोधन केंद्रात कामाला सुरुवात केली.

१९९३ साली त्यांची ओव्हरसेट मेथड्स इनकॉर्पोरेशन, लॉस अल्टोस, कॅलिफोर्निया (Overset Methods, Inc.) येथे उपाध्यक्ष आणि संशोधन वैज्ञानिक म्हणून निवड झाली. कल्पना चावला यांनी काम केलेल्या प्रकल्पांचे निष्कर्ष व शोध विविध परिषदांतील चर्चासत्र आणि शोधपत्रिकांमध्ये समाविष्ट करण्यात आले.

डिसेंबर १९९४ मध्ये त्यांची निवड नासामध्ये अंतराळवीर म्हणून झाली. एक वर्षाच्या प्रशिक्षणानंतर आणि परीक्षेनंतर चावला तांत्रिक बाबींवर काम करणाऱ्या ॲस्ट्रॉनॉट ऑफिस, एव्हा (EVA), रोबॉटिक्स अँड कॉम्प्युटर ब्रँच या कार्यालयात रुजू झाल्या.

१९९६ साली त्यांची निवड STS-87 अवकाशाला यानावर मोहीम विशेषज्ञ आणि प्रमुख रोबॉटिक हस्तचालक म्हणून करण्यात आली. त्यांनी पहिले अंतराळ उड्डाण STS-८७ कोलंबिया या अवकाशयानमधून १९ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर १९९७ एवढ्या कालावधीकरिता केले.

या मोहिमेत अंतराळामध्ये भारहिनता कोणत्या प्रकारे भौतिक क्रियांना प्रभावित करते. याविषयीच्या तसेच सूर्याच्या बाह्य वातावरणीय प्रतलांचे निरीक्षण यावर भर दिलेला होता. सदस्यांपैकी दोन जणांनी अवकाशात चालण्याची कृती केली होती, त्यात चावलांचा समावेश होता.

ही मोहीम अवकाशात ३७६ तास आणि ३४ मिनिटे राहिली तर अवकाशयानाने पृथ्वीभोवती २५२ वेळा परिभ्रमण केले. त्यानंतर नासाने जेव्हा एक महत्त्वपूर्ण योजना आखली तेव्हा अनुभवी अंतराळवीर कल्पना चावला ७ सदस्यांच्या टीममध्ये महत्त्वाची जबाबदारीही त्याच्याकडं देण्यात आली. जानेवारी २००३ च्या १६ दिवसांच्या मिशनमध्ये त्यांची विशेष तज्ज्ञ म्हणून नेमणूक केली. अंतराळात केले जाणारे प्रयोग हे कल्पना यांच्या नियंत्रणाखाली करण्यात आले होते. मात्र १ फेब्रुवारी रोजी जी घटना घडली त्या घटनेमुळे अजूनही एखाद्याच्या डोळ्यात पाणी उभे राहिल अशी ती परिस्थिती होती.

अवकाशातून पृथ्वीवर येणाऱ्या कोलंबिया अवकाशयानाला स्फोट झाला. हा स्फोट इतका भयंकर होती की, त्या अवकाशयानाचा अगदी चुरा होऊन गेला होता. या भयंकर धक्कादायक घटनेमध्ये स्फोट झालेल्या अवकाशयानात कल्पना चावला आणि अन्य अंतराळवीरांचा मृत्यू झाला. त्यानंतरच्या काही कालावधीत कल्पना चावला या तरुण वर्गासाठी प्रेरणास्थान बनली. कल्पना चावला यांच्या विचाराने अनेकांना आयुष्यात उंच भरारी घेण्यासाठी पंखात बळ दिले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com