फोटो गॅलरी
International Yoga Day : ते तंदुरूस्त तर आपण सुरक्षीत, सीमेवर जवानांचा योग दिन... पहा PHOTO/VIDEO
आज २१ जून रोजी जगभरात आठवा आंतरराष्ट्रीय योगा दिवस (International Yoga Day 2022) साजरा केला जात आहे.
राजकीय नेत्यांपासून आधिकारी, सेलिब्रिटी, विद्यार्थी आणि जवानांनी योग करत आजचा दिवस साजरा करत आहे.
देशाच्या तिन्ही दलांनीही या योग उत्सवाचा ‘सुवर्णयोग’ साधला आहे.
इंडो-तिबेटीयन बॉर्डर (ITBP) आणि बॉर्डर सिक्योरिटी फोर्स (BSF) च्या जवानांनी उणे डिग्री तापमानात योगाभ्यस केला.
हिमालयात उत्तुंग शिखरांवर सुरक्षेसाठी तैनात असलेल्या लष्कराच्या जवानांनीही योग करत आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला.
सिक्कीममध्ये ITBP च्या जवानांनी १७ हजार फूट उंचीवर बर्फामध्ये योगाभ्यास केला. मोठ्या संख्येने सैनिकांनी योगाभ्यास करून दिवसाची सुरुवात केली.
ITBP च्या जवानांनी उत्तराखंडच्या हिमालयात खूप उंचावर योगासने केली.