PHOTO : स्वदेशी बनावटीची ‘INS विशाखापट्टणम’ सेवेत रुजू

PHOTO : स्वदेशी बनावटीची ‘INS विशाखापट्टणम’ सेवेत रुजू
Published on
2 min read

आयएनएस विशाखापट्टणमच्या कमिशनिंग समारंभाला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह प्रमुख पाहुणे होते.

भारताची सर्वात शक्तिशाली युद्धनौका ‘INS विशाखापट्टणम’ आज भारतीय नौदलात सामील झाली.

'विशाखापट्टणम' नावाच्या या जहाजाचे बांधकाम आणि वितरण हे स्वदेशी युद्धनौका बांधण्याच्या कार्यक्रमांच्या दृष्टीने सरकार आणि नौदलासाठी एक मैलाचं पाऊल आहे.

विशाखापट्टणम नौदलात सामील झाल्यामुळे, प्रगत युद्धनौका डिझाइन आणि तयार करण्याची क्षमता असलेला देश म्हणून भारताची जगभरात ओळख होईल.

INS विशाखापट्टणमची निर्मिती Mazagon Dock Shipbuilders ने केली आहे. ही नाशक युद्धनौका पूर्णपणे स्वदेशी आहे.

ऑक्टोबर 2013 मध्ये या युद्धनौकेचे बांधकाम सुरू झाले. या युद्धनौकेचे वजन 7400 टन असल्याचे सांगण्यात येत आहे.

INS विशाखापट्टणमची एकूण लांबी ट्रेनच्या 7 डब्यांच्या लांबीइतकी 535 फूट आहे.

ही भारतातील सर्वात लांब विनाशकारी युद्धनौका आहे, ज्यावर 50 अधिकाऱ्यांसह सुमारे 300 नाविक तैनात केले जाऊ शकतात. या युद्धनौकेवर अनेक आधुनिक शस्त्रे तैनात करण्यात आली आहेत.

स्वदेशी बनावटीचे ब्रह्मोस क्षेपणास्त्र आयएनएस विशाखापट्टणमवर तैनात करण्यात आले आहे. त्यावर तैनात केलेले क्षेपणास्त्र 70 किमी अंतरावरुन हवेत उडणारे शत्रूचे लढाऊ विमान नष्ट करू शकते.

Related Stories

No stories found.