AirForceDay : 'ही' आहेत भारतीय हवाई दलाच्या ताफ्यातील ताकतवर लढाऊ विमाने

AirForceDay : 'ही' आहेत भारतीय हवाई दलाच्या ताफ्यातील ताकतवर लढाऊ विमाने
एच.ए.एल. तेजस/HAL Tejas

आज ८९ वा भारतीय वायुसेना दिवस साजरा केला जात आहे. भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे उलटली आहे. भारताच्या वायुसेनेची ताकत चार पटीने वाढली आहे. भारतीय हवाई दल जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे दल समजले जाते. हवाई दलात १ लाख ४० हजार कर्मचारी काम करतात. तसेच १ हजार ८२० वेगवेगळी अत्याधुनिक धाटणीची विमाने आहेत. हवाई दलाकडे देशसुरक्षेसाठी वेगवेगळ्या प्रकारची लढाऊ विमानानेही आहेत. यात 'सुखोई एसयू-30 एमकेआई', 'मिराज-2000', तेजस एलसीए आणि राफेल इत्यादी सामील आहेत....

राफेल
राफेल

राफेल : विविध प्रकारचे क्षेपणास्र डागण्याची क्षमता असलेल्या अत्याधुनिक राफेलची सध्या जोरदार चर्चा आहे. हे एक ४.५ जनरेशनचे लढाऊ विमान आहे. राफेल या विमानात 74 किलो न्यूटन थ्रस्टचे दोन एम 88-3 साफ्रान इंजिन देण्यात आले आहेत. हे फायटर जेट एकमेकांना उड्डाण करण्यासाठी मदत करतात. राफेल फाइटर जेट एका विमानातून दुसऱ्या विमानात इंधन भरण्यासाठीदेखील मदत करतात. तब्बल 2 हजार 222.6 किलोमीटर प्रति तासाच्या स्पीडने ५० हजार फूटा पर्यंत उडू शकते.

सुखोई एसयू-३० एमकेआय/Sukhoi Su-30MKI
सुखोई एसयू-३० एमकेआय/Sukhoi Su-30MKI

सुखोई-30 MKI : रशियन बनावटीच्या या दोन सीटर फाइटर जेट One X 30mm GSH गन ने स्वयंपूर्ण आहे. याशिवाय हे फाइटर जेट 8 हजार किलो वजनाच्या युद्धसामुग्री वाहून नेण्यात सक्षम आहे. हे फायटर जेट हवेत मिसाईल आणि जवळच्या रेंजमधील मिसाइल्ससोबत उडाण करून शकते. 2 हजार 500 किमी प्रतितास या वेगाने हे फायटर जेट लक्ष्य साधू शकते.

दसॉल्ट मिराज २०००/Dassault Mirage 2000
दसॉल्ट मिराज २०००/Dassault Mirage 2000

मिराज-2000 : 2 हजार 336 किलोमीटर प्रति तास या वेगाने हे विमान उडू शकते. दोन इंजिन असलेल्या या विमानाला 13 हजार 800 किलो दारुगोळा वाहून नेण्याची क्षमता आहे. चौथ्या पिढीच्या असलेल्या या लढाऊ विमानाने कारगिल युद्धात महत्वपूर्ण भूमिका बजावली. या विमानाचा वापर जगात नऊ देश करतात.

एच.ए.एल. तेजस/HAL Tejas
एच.ए.एल. तेजस/HAL Tejas

एलसीए-तेजस: हे विमान भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानातील मोठी उमेद बनणार आहे. एलसीए-तेजसमध्ये अनेक वेगवेगळे फीचर्स आहेत ज्यांचा वापरअद्याप भारताने केलेलेही नाहीये.

मिग-21 बाइसन: रशियन बनावटीच्या या फायटर जेटला एक इंजिन आहे. बहुभुमिका म्हणजेच मल्टीरोल फाइटर असे संबोधले जाणारे हे विमान आहे. इंडियन एयरफोर्ससाठी हा एक कणा मानला जातो. या फायटरचा वेग 2 हजार 230 किलोमीटर प्रति तास इतका आहे. मिग-21 बाइसन 23mm ट्वीन बैरल कैनन आणि R-60 क्लोज कॉम्बैट मिसाइल सोबत उड्डाण करू शकते.

Related Stories

No stories found.