Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याIndian Air Force Day 2020 : जाणून घ्या, भारतीय हवाई दलातील घातक...

Indian Air Force Day 2020 : जाणून घ्या, भारतीय हवाई दलातील घातक लढाऊ विमानांबद्दल…

आज ८ ऑक्टोबर म्हणजेच भारतीय हवाई दलाचा वर्धापनदिन. ८८ वर्षांपूर्वी १९३२ साली आजच्याच दिवशी भारतीय हवाई दलाची स्थापना झाली. मागील नऊ दशकांमध्ये भारतीय हवाई दलाने गरुड झेप घेतली आहे. आजच्या ८८ व्या वर्धापनदिनानिमित्त पाहुयात भारतीय हवाई दलातील घातक लढाऊ विमानांबद्दल…

सुखोई एसयू-३० एमकेआय हे भारतीय वायुसेनेतील एक बहुउद्देशीय लढाऊ विमान आहे. रशियाच्या सुखोई आणि भारताच्या हिंदुस्तान एअरोनॉटीक्स लिमिटेड ने याची निर्मिती भारतीय वायुसेने करिता केली आहे. हे विमान सुखोई एसयू – ३० या विमानाची सुधारित अवृत्ती आहे.

- Advertisement -

मिराज विमान सुखोईची सुधारीत आवृत्ती मानली जाते. या विमानांची निर्मिती ‘दसॉल्ट’ कंपनीने सर्वप्रथम केली होती. १९८२पासून ही विमानं भारतातच बनवली जात आहेत. या विमानांमध्ये आधुनिक इलेक्ट्रॉनिकस सिस्टीम वापरण्यात आली आहे. मिराज विमानांचा वेग प्रति तास २००० किमी इतका आहे. मिराज २००० ही विमानं एकाच वेळी अनेक कामं करू शकतात. शत्रूशी दोन हात करताना बॉम्बवर्षावही करू शकतात. या विमानाची स्कॅनिंग रेंज केवळ १४५ किमी आहे, जी इतर विमानांच्या तुलनेत अत्यंत कमी आहे. ही या विमानांची एकमेव कमतरता आहे.

एच.ए.एल. तेजस हलक्या वजनाच्या लढाऊ विमानवर्गातील अर्थात लाइट कॉंबॅट एरक्राफ (एल.सी.ए.) वर्गातील संपूर्ण भारतीय बनावटीचे लढाऊ विमान आहे. इ.स. १९८३ साली एल.सी.ए. हा कार्यक्रम भारतीय शासनातर्फे हाती घेण्यात आला. इ.स. १९७०च्या दशकापासून भारतीय वायु सेना रशियन बनावटीच्या मिग २१ व मिग २३ अवलंबून होती. इ.स. १९९०च्या दशकात या विमानांचा सुमारे २० वर्षांचा सेवाकाळ संपल्यावर वायुसेनेत मोठी पोकळी निर्माण होण्याची शक्यता होती. तसेच विदेशी बनावटीच्या विमानांवरील अवलंबन कमी व्हावे हासुद्धा विचार त्यामागे होता. या विमानाची निर्मिती हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड या कंपनीने तर्फे करण्यात आली.

भारतीय हवाई दलाचे दोन इंजिने असलेले छोटे लढाऊ विमान आहे. ‘जग्वार’ हे कमी उंचीवरून उडत लक्ष्यांचा वेध घेणारे लढाऊ विमान आहे. भारतीय हवाईदलात सध्या जमीन आणि सागरी संरक्षणासाठी दोन प्रकारची ‘जग्वार’ विमाने वापरली जातात. हे वजनाने हलके, चपळ, तांत्रिकदृष्ट्या कमी गुंतागुंतीचे आहे. भारतीय हवाई दलातील जग्वार ही महत्त्वाची विमाने आहेत. कारगिलच्या युद्धात या विमानांनी केलेल्या अचूक बॉम्बफेकीमुळेच भारताला फायदा झाला असे मानले जाते. हवाई दलात या विमानांचा वापर इ.स. १९७९ पासून होतो आहे.

राफेल असं लढाऊ विमान आहे, जे प्रत्येक मोहीमेवर पाठवलं जाऊ शकतं. भारतीय वायूसेना अनेक वर्षांपासून राफेलच्या प्रतीक्षेत होती. हे विमान एका मिनिटात 60 हजार फूट उंचीपर्यंत जाऊ शकतं. याची इंधन क्षमता 17 हजार किलो आहे. राफेल विमान हरतऱ्हेच्या हवामानात एकाच वेळी अनेक कामं करण्यास सक्षम आहे. त्यामुळे ते मल्टिरोल फायटर एअरक्राफ्ट म्हणूनही ओळखलं जातं. यामध्ये स्काल्प मिसाईल आहे, जे हवेतून जमिनीवर मारा करण्यास सक्षम आहे. राफेलची मारक क्षमता 3700 किलोमीटरपर्यंत आहे, तर स्काल्पची रेंज 300 किलोमीटर आहे. हे अँटी शिप हल्ल्यापासून अणुबॉम्ब हल्ल्यापर्यंत, क्लोज एअर सपोर्ट आणि लेजर डायरेक्ट लॉन्ग रेंज मिसाईल अॅटॅकमध्येही अव्वल आहे. राफेल विमान 24,500 किलोपर्यंत वजन घेऊन जाऊ शकतं आणि 60 तासांचं अतिरिक्त उड्डाणही करु शकतं. राफेल विमानाचा वेग 2,223 किलोमीटर प्रति तास आहे.

साब जेएएस ३९ ग्रायपेन हे स्वीडीश विमान कंपनी साबने विकसित केलेले कमी वजनाचे एका इंजीनचे बहुउद्देशीय लढाऊ विमान आहे.

मिकोयान मिग-२१ हे एक सुपरसॉनिक प्रकारातील एका इंजिनाचे, रशियन बनावटीचे लढाऊ विमान आहे. या विमानाला बालालैका या टोपणनावानेही ओळखतात कारत हे त्या सदृष दिसणार्‍या रशियन वाद्या सारखे दिसते. या विमानाच्या आकारामुळे त्याला पेन्सिल म्हणूनही ओळखले जाते. जगातील सुमारे ५० देशांमध्ये चार खंडात हे विमान वापरात आहे. हे जगातले सर्वाधिक प्रमाणात निर्मिती झालेले विमान आहे. भारतात इ.स. १९६६ मध्ये नाशिक जवळ हिंदुस्थान एरॉनॉटिक्स कंपनीच्या कारखान्यात या विमानांच्या उत्पादनास सुरुवात झाली आणि ६५७ विमानांची निर्मिती करण्यात आली.

युरोफायटर टायफून ही विमाने जर्मनी आणि इंग्लंड यांनी एकत्रितरित्या बनवलेली आहेत. हा प्रकल्प सुमारे इ.स. १९७१ नंतर सुरू झाला इ.स. १९९० च्या दशकात जर्मनीकडे पैसे नसल्याने काहीसा रेंगाळला होता. परंतु, पुढे २००२ नंतर ऑस्ट्रिया, स्पेन व इतर देशांनी या विमानांच्या खरेदीत रस घेतल्याने प्रकल्प परत रुळावर आला. हे विमान अनेक विमान कंपन्यांना एकत्र आणून बनवलेले आहे. कार्बन फायबर आणि इतर साहित्याद्वारे हे हलके लढाऊ विमान बनवले जाते. नव्या तंत्रज्ञानाने सुसज्ज कॉकपीट आणि एकापेक्षा अधिक धोक्यांकडे एकावेळी लक्ष पुरवण्याची क्षमता या विमानात आहे. सुखोई एम के आय जसे हवेतल्या हवेत निरनिराळ्या प्रकारे वळवता येते; तसेच युरोफायटर टायफून विमान हवेमध्ये अतिशय सुळसुळीतपणे हाताळता येते, हा याचा मोठा गूण मानला जातो. तसेच रडारवरून आपले अस्तित्त्व कमी करण्यासाठी असलेले तंत्रज्ञान हे सुखोईपेक्षाही प्रगत असल्याचा दावा केला जातो.

- Advertisment -

ताज्या बातम्या