Saturday, April 27, 2024
HomeUncategorizedPhoto Gallery: या मार्गदर्शक दगडांचे महत्व

Photo Gallery: या मार्गदर्शक दगडांचे महत्व

रस्त्याच्या कडेला माइल स्टोन (Milestone) म्हणजेच किलोमीटरची नोंद (Kilometer record) असलेले दगड तुम्ही अनेकवेळा बघितले असेल. या दगडांवर कोणत्यातरी ठिकाणांचे अंतर आणि त्याचे नाव लिहिलेले असते. या दगडांच्या वरच्या भागावर पिवळा, हिरवा, काळा आणि नारंगी रंग (Yellow, green, black and orange) असतो. तर सर्व दगडांच्या खालच्या भागावर पाढंरा रंग दिलेला असतो. मात्र तुम्हाला माहिती आहे का या दगडांवर वेगवेगळे रंग का लावले जातात?

अनेकवेळा हायवेवर अथवा एखाद्या गावाच्या ठिकाणी जाताना तुम्ही असे अनेक दगड बघितले असतील. मात्र त्याच्यावरील असलेल्या किलोमीटरचे अंतर सोडून आपण कशावरच लक्ष देत नसतो. मात्र हे वेगवेगळ्या रंगाचे दगड खूप महत्त्वाचे असतात, याबद्दल खूप कमी लोकांना माहिती आहे.

- Advertisement -

रस्त्यावर चालताना अथवा ड्राइव करताना रस्त्याच्या कडेला तुम्हाला पिवळ्या रंगाचा दगड दिसला तर समजून घ्या की, तुम्ही नँशनल हायवे (National Highway) म्हणजेच राष्ट्रीय महामार्गावर आहात.

जर तुम्हाला हिरव्या रंगाचा दगड जर रस्त्यावर दिसला तर समजून घ्या की, तुम्ही राष्ट्रीय महामार्गावर नाही तर राज्य महामार्गावर (State highways) आहात.

जर तुम्हाला रस्त्यावर काळ्या, निळ्या आणि पांढर्‍या रंगाच्या पट्टीचा दगड दिसला तर समजून घेऊया तुम्ही कोणत्या तरी मोठ्या शहरात (Big city) अथवा जिल्ह्यात आहात.

तुम्हाला जर रस्त्यावर नारंगी रंगाच्या पट्टीचा दगड दिसला तर समजून जा की, तुम्ही एखाद्या गावाच्या रस्त्यावर (Village road) अथवा गावामध्ये आहात.

- Advertisment -

ताज्या बातम्या