‘विकेंड’ची सायंकाळ स्वप्नातील घराच्या शोधात

‘देशदूत प्रॉपर्टी एक्स्पो’ला दुसर्‍या दिवशीही उदंड प्रतिसाद, रविवार शेवटचा दिवस
‘विकेंड’ची सायंकाळ स्वप्नातील घराच्या शोधात
Published on
2 min read

नाशिक । प्रतिनिधी Nashik

युवकांपासून व्यावसायिक आणि ज्येष्ठ नागरिकांपासून महिलांपर्यंत विविध श्रेणीतील हजारो नागरिकांच्या भेटीचा ओघ हे ‘देशदूत प्रॉपर्टी एक्स्पो’च्या (Deshdoot Property Expo 2022) दुसर्‍या दिवसाचे वैशिष्ट्य ठरले. आज शनिवारची सायंकाळ स्वप्नातील घराच्या शोधात घालवून नाशिकरोडवासीयांनी ‘विकेंड’चा पुरेपूर आनंद घेतला....(Huge response to nashikroad property expo 2022)

‘देशदूत’ आयोजित 'प्रॉपर्टी एक्स्पो'त सहभागी बांधकाम व्यावसायिकांचे प्रकल्प मध्यमवर्गीयांपासून उच्च मध्यमवर्गीयांपर्यंत सर्वच घटकांना सुयोग्य पर्याय उपलब्ध करून देत आहेत. या पर्यायांना गृहवित्त पुरवठादार संस्थांची जोड लाभली आहे. त्यामुळे हा दुग्धशर्करा योग मानून नागरिक सहकुटुंब गर्दी करीत आहेत. आज दुपारी 4 वाजेपासून सुरू झालेला गर्दीचा ओघ रात्री 9 पर्यंत सुरू होता.

स्टॉलधारकांकडून प्रदर्शनात आलेल्या कुटुंबियांना पूरक माहिती देण्यात आली. नाशिकरोड परिसरातील घरांचे पर्याय प्रत्यक्ष डोळ्यांत साठवता यावेत या उद्देशाने काही सहभागी बांधकाम व्यावसायिकांनी प्रत्यक्ष ‘साईट व्हिजीट’ची (Site Visit) सुविधाही उपलब्ध करून दिली आहे. उद्या रविवारी प्रदर्शनाचा समारोप होत आहे. नागरिकांनी दुपारी 4 ते रात्री 9 या वेळेत प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

स्तुत्य उपक्रम

प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातील एक आनंदाचा क्षण म्हणजे घर खरेदी! ‘देशदूत’च्या प्रदर्शनातून असंख्य नाशिकरोडवासीयांना हे क्षण अनुभवता येणार आहेत. ‘प्रॉपर्टी एक्स्पो’ उपक्रम स्तुत्य आहे. त्याअंतर्गत मध्यमवर्गीयांवर फोकस ठेवण्यात आला हे महत्त्वाचे! प्रदर्शन आयोजनाबद्दल ‘देशदूत’चे मन:पूर्वक अभिनंदन!

- सुनिल आडके

निवडीचे स्वातंत्र्य

नाशिकरोड परिसरात प्रथमच 'आऊटडोअर प्रॉपर्टी एक्स्पो' आयोजित करून ‘देशदूत’ने आदर्श पायंडा पाडला आहे. स्वप्नातील घरांचे नानाविध पर्याय एकाच छताखाली उपलब्ध असल्याने निवडीचे स्वातंत्र्य मिळते. नाशिकरोडवासीयांच्या सेवेत हा उपक्रम दाखल झाल्याने आम्ही समाधानी आहोत.

- सुनिल माळी

स्तुत्य उपक्रम

‘देशदूत‘ने प्रॉपर्टी प्रदर्शन भरवून नाशिकरोडकरांमध्ये वेगळे स्थान निर्माण केले आहे. एकाच छताखाली घरांचे अनेक पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. हा उपक्रम स्तुत्य आहे. नागरिक प्रदर्शनाचा लाभ घेत असल्याचे गर्दीवरून दिसते.

- संजय शिलारकर

सर्वांना लाभदायी

नाशिकरोड परिसरात व तेसुद्धा जेलरोडवरील हमरस्त्यावर 'देशदूत'ने भरवलेले प्रॉपर्टी प्रदर्शन मध्यमवर्गीयांसाठी उपयुक्त आहे. यातून अनेकांना गृहप्रकल्पांची माहिती मिळत आहे. त्यामुळे प्रदर्शनाचा सर्वांना लाभ होणार आहे.

- मुकुंद बुरकुले

लकी ड्रॉ विजेते

सोनी गिफ़्टकडून बक्षीसे : सुधाकर सोनवणे, राजेंद्र डमाळे, शेखर बाहेती, एम. ए. पटेल, भास्कर फेगडे. मयूर अलंकारकडून बक्षीसे : महेश अहिरे, गणेश काळे, योगेश वाघ.

Related Stories

No stories found.