Photo Gallery : लसीकरणासाठी नाशकात उदंड प्रतिसाद; पाहा सद्यस्थिती

Photo Gallery : लसीकरणासाठी नाशकात उदंड प्रतिसाद; पाहा सद्यस्थिती

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नाशिक जिल्ह्यात आज १५ ते १८ वर्षाच्या मुलांसाठी करोना प्रतिबंधक लसीचे लसीकरण सुरु झाले. सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात लसीकरण करून घेण्यासाठी मुलामुलींनी गर्दी केली आहे. आज सकाळी नवीन बिटको रुग्णालय येथे केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांच्या उपस्थित लसीकरणाचा प्रारंभ करण्यात आला....

यावेळी महापौर सतीश कुलकर्णी, अतिरिक्त आयुक्त सुरेश खाडे, शिक्षण समिती सभापती संगीता गायकवाड, नगरसेवक संभाजी मोरुस्कर,सूर्यकांत लवटे,नगरसेविका कोमल मेहरोलिया ,उपसंचालक आरोग्य सेवा नाशिक मंडळ डाॅ.पुना गांडाळ,आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ.अजिता साळुंखे,बिटको हॉस्पिटलचे डॉ.जितेंद्र धनेश्वर आदींसह शासनाचे व मनपा अधिकारी पदाधिकारी या कार्यक्रमास उपस्थित होते.

यावेळी केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री डॉ.पवार यांनी लस घेण्यासाठी आलेल्या १५ वर्ष ते १८ वर्षाच्या आतील वयोगटातील मुला व मुलींशी संवाद साधला. तसेच लस घेतल्यानंतरही कोविड-१९ च्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले.

लस घेण्याबाबत या वयोगटात असणाऱ्या मुला व मुलींमध्ये असणारी उत्सुकता यावेळी त्यांनी जाणून घेतली. तसेच वैद्यकीय विभागाकडून लसीकरण मोहिमेचा आढावा घेतला. नाशिक महानगरपालिकेच्या वतीने १५ वर्ष ते १८ वर्षाच्या आतील वयोगटासाठी शहरातील ६ ठिकाणी कोव्हँक्सिनसाठी लसीकरण केंद्रावर व्यवस्था केली आहे. प्रत्येकी ऑनलाईन स्लॉट १०० ठेवण्यात आले आहे.

इथे सुरु आहे लसीकरण

१)मेरी कोविड सेन्टर,पंचवटी

२)समाज कल्याण,नाशिक पुणे रोड

३)सिडको श प्रा आ केंद्र

४)डॉ. झाकीर हुसेन रुग्णालय

५)ESIS हॉस्पिटल सातपूर

६)न्यू बिटको ,नाशिकरोड

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com