Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedलंगोटदारप्रमाणे कोरोनाच्याही पतंगी

लंगोटदारप्रमाणे कोरोनाच्याही पतंगी

सर्व छायाचित्र : सतीश देवगिरे

भारतात संक्रातीला पतंग उडवण्याची प्रथा आहे. अनेक ठिकाणी पतंग उत्सव भरवला जातो. नाशिक जिल्ह्यातील येवल्यातही पतंग उत्सव साजरा केला जातो. जाणून घेऊन या पतंगाचा इतिहास, पतंग उत्सवाची माहिती फोटो स्टोरीच्या माध्यमातून…

- Advertisement -

इतिहास

पतंगाचा शोध प्राचीन आहे. पहिला पतंग चीनमध्ये उडवला गेला असे उल्लेख आढळतात. बेंजामिन फ्रॅन्कलिन या शास्त्रज्ञाने ढगांमध्ये विद्युत उर्जा असतात हे पतंगाच्या दोराला धातूच्या तारा बांधून सिद्ध केले होते. पतंगाचा खेळ अनेक शतकांपासून भारतीयांना परिचित आहे. हा खेळ चीनमधून भारतात आला, असे एक मत आहे.

भारतात मोगलांच्या काळात पतंगाचा छंद विशेष जोपासला गेला. उत्तर भारतात हा खेळ विशेषत्वाने खेळला जातो. गुजरातमध्ये पतंगाचा खेळ सर्वांत जास्त लोकप्रिय आहे. दिवाळीनंतर या खेळाचा हंगाम सुरू होतो आणि तो संक्रांतीनंतर संपतो. संक्रांतीचा दिवस फार महत्वाचा असतो. महाराष्ट्रातही पतंगाचा खेळ मुलांमध्ये विशेष प्रिय आहे. चीनमध्ये नवव्या महिन्याचा नववा दिवस हा ‘पतंग दिन’ म्हणून पाळला जातो.

पतंगांची नावे

पतंगांच्या आकृतीनुसार व त्यावर असलेल्या सुशोभिकरणानुसार वेगवेगळी नावे देण्यात येतात. या नावांत फारसी शब्द जास्त आहेत.

लंगोटदार(वरचे टोकापासून खालचे टोकापर्यंत असलेला रंगीत तावाचा पट्टा), टोकदार(फक्त टोकावर रंगीत), सब्बलदार, पटलेदार(रंगीबेरंगी आडवे पट्टे असलेली),मुछाकडा,आॲंखेदार,सिंगदार,चाॲंददार

आकारानुसार:चिल (सर्वसाधारण रुंदीपेक्षा, रुंदी जास्त असणारी),चिन्नाकडी(छोटी पतंग), धड्डा(खूप मोठी पतंग) त्यात(सुशोभिकरणानुसार) या नावांची सरमिसळ करुनही अनेक इतर नावे बनतात.

पतंगांचे विविध आकार आणि प्रकार दिसून येतात. पक्षी, माणसे, जहाजे, फुलपाखरे इ. विविध आकारांत पतंग तयार करतात. पेटी-पतंग (बॉक्स काइट) हा प्रकारही विशेष लोकप्रिय आहे. भारतीय पतंग सामान्यतः चौकोनी आकाराचे असतात. पतंगाचा आकार व किंमती यांवरून ‘पैचुडी’, ‘चापट’, ‘अद्धा’, ‘पोण्या’, ‘ताव्या’ इ. प्रकार केले जातात. चिनी पतंग सामान्यतः बदामाकृती असतात. चिनी पतंगांना किल्येकदा ‘ड्रॅगन’चा वैशिष्ट्यपूर्ण आकार दिला जातो. विविध प्रकारच्या पतंगांना शोभा आणण्यासाठी चित्रविचित्र रंग आणि वस्तू यांचे उपयोजन केले जाते. कित्येकदा पतंग एकाच रंगीत कागदाचा न बनविता अनेक रंगीत लहान-लहाने तुकड्यांचा बनवितात.

अशी हवी पतंग

पतंगाच्या आकाराला योग्य अशा कामट्या व इतर आवरण वापरल्यास आणि जरूर त्या ठिकाणी दोरे बांधून समतोल साधल्यास पतंग योग्य रीतीने हवेत वरवर जातो व संथपणे तरंगतो; इतकेच नव्हे, तर दोरी ज्याच्या हातात असेल त्याची पतंगावर संपूर्ण हुकमत राहू शकते. हा तोल साधला नाही किंवा पतंगाच्या कामट्या बारीक असल्या, तर पतंग एका बाजूला जाणे, खाली झेप घेणे, गरगर फिरू लागणे इ. दोष उद्‌भवतात. पतंग सहज फाटू नये, म्हणून कागदाच्या कडांत दुमडण्यापूर्वी दोरा घालण्यात येतो. पतंग उडवण्यासाठी जो दोरा वापरतात, तो पीळदार व बळकट असावा लागतो. या दोऱ्यावर काचेची पूड, खळ वगैरे पदार्थांचे लुकण लावून हा दोरा म्हणजे ‘मांजा’ तयार करतात.

पतंगांची लढाई

पतंग उंच उडवण्यामध्ये जशी मौज असते, तशीच पतंगांची लढाई लढवण्यातही. पतंगाची लढाई म्हणजे काटाकाटी करावयासाठी वाऱ्याची दिशा, वेग, आपल्या पतंगाची कुवत, मांजाची प्रत यांचा अंदाज घेऊन प्रतिपक्षाच्या पतंगाजवळ, वर किंवा खाली पतंग न्यावयासाठी कौशल्य लागते. पेच घेऊन दुसऱ्या पतंगावर मात करावयाची असल्यास पतंगावर स्वतःची संपूर्ण हुकमत असावी लागते. पेच चालू झाला, म्हणजे दोन्ही पतंगाचे मांजे एकमेकांवर घासू लागतात. पतंग सरसर ओढून अथवा ढिला सोडून प्रतिपक्षाचा पतंग कापता येतो. विरोधकाच्या पतंगाच्या वरून किंवा खालून आपला पतंग नेऊन हे काम साधता येते.

काय हवा हवेचा वेग

पतंग उंच उडविण्याच्या खेळासाठी दर तासाला १२.८७ किमी. ते ३२.१८ किमी. (८ ते २० मैल) वाऱ्याचा वेग चांगला. १२.८७ किमी. पेक्षा वेग कमी असेल, तर पतंग हवेत उंच नेणे कठीण पडते. वेग जास्त असेल, तर पतंगावर हुकमत ठेवणे कठीण होते. पतंगाचा मांजा ओलसर असेल, तर जास्त विद्युत् दाबाची वीज वाहून नेणाऱ्या तारांना तो चिकटून धक्का बसण्याचे किंवा अपघात होण्याचे भय असते.

- Advertisment -

ताज्या बातम्या