बेस्ट इज बेस्ट!
फोटो गॅलरी

बेस्ट इज बेस्ट!

15 जुलै 1926 रोजी मुंबईतील पहिली बस अफगाण चर्च ते क्रॉफर्ड मार्केट या मार्गावर धावली

Nilesh Jadhav

मुंबईतील चाकरमान्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या बेस्टची पहिली बस धावली, त्यास आज 94 वर्षे झाली. 15 जुलै 1926 रोजी मुंबईतील पहिली बस अफगाण चर्च ते क्रॉफर्ड मार्केट या मार्गावर धावली.

courtesy : pinterest

या बससेवेेचे तत्कालीन मुंबईकरांनी उत्साहाने स्वागत केले होते. त्यावेळेसही टॅक्सी चालकांनी या बससेवेला कडाडून विरोध केला होता. टॅक्सी चालकांचा विरोध असताना देखील 1926 च्या वर्षा अखेरीपर्यंत तब्बल 6 लाख प्रवाशांनी या बसने प्रवास केला, अशी नोंद आढळते.

courtesy : pinterest

त्याआधी या बससेवेचे प्रारंभिक रूप होते घोडागाडी! 9 मे 1874 मध्ये ती सुरू झाली. त्याकाळी बॉम्बे ट्रामवे कंपनीची स्थापना झाली होती. या कंपनीकडे मुंबईत प्रवासी घोडागाडी चालविण्याचा परवाना होता. या गाडीला दोन घोडे जुंपून खेचले जात असे. मुंबईचा विकास होत गेला तशी ही सेवा काळाच्या आड गेली.

courtesy : MeMumbai

कालांतराने मुंबई महापालिकेने 1905 मध्ये बॉम्बे इलेक्ट्रीक सप्लाय अ‍ॅण्ड ट्रामवेस् म्हणजेच बेस्ट या कंपनीची स्थापना केली आणि बॉम्बे ट्रामवे कंपनी विकत घेतली. बेस्टची पहिली इलेक्ट्रिक बस 7 मे 1907 रोजी धावली. ही बससेवा प्रवाशांच्या पसंतीला उतरली. इलेक्ट्रिक बससेवा प्रवाशांना प्रचंड आवडली. गर्दीमुळे बेस्टला डबल डेक्कर बससेवा सुरू करावी लागली. पुढे इलेक्ट्रिक बस सेवा बंद करावी लागली.

courtesy : MeMumbai

बदलत्या काळानुरूप बेस्टने देखील कात टाकली. मग मोटरबस रस्त्यावर आली. तो दिवस होता 15 जुलै 1926. मोटर बससेवा देखील इलेक्ट्रिक बससेवेसारखी प्रवशांच्या पसंतीस उतरली. 1937 मध्ये डबल डेकर मोटरबस धावू लागली.

courtesy : pinterest

दुसर्‍या महायुद्धानंतर 7 ऑगस्ट 1947 च्या दिवशी बेस्ट मुंबई महानगरपालिकेत सामावून घेण्यात आली. कालांतराने बॉम्बेचे मुंबई झाले म्हणून बॉम्बे इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट चे नाव बदलून बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्स्पोर्ट असे करण्यात आले.

बेस्टला आतापर्यंत अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. 2013 च्या आकडेवारीप्रमाणे बेस्टकडे 4680 बस आणि 365 वाहतूक मार्ग आहेत आणि त्यावर्षी 50 लाख लोकांनी या बसेसमधून प्रवास केला होता.

आजही बेस्ट त्याच जोमाने मुंबईकरांसाठी धावत आहे.

courtesy :CGPI
Deshdoot
www.deshdoot.com