Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedनाशकात पुन्हा जोर'धार', पाहा फोटो...

नाशकात पुन्हा जोर’धार’, पाहा फोटो…

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

गेल्या काही दिवसांच्या उघडिपीनंतर नाशिक शहरात आज पुन्हा जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. अचानक आलेल्या पावसामुळे नाशिककरांची चांगलीच तारांबळ उडाल्याचे चित्र आहे….

- Advertisement -

आज सकाळपासून वातावरणात उकाडा जाणवत होता. दुपारी अचानक ढग दाटून आले आणि दोन वाजेच्या सुमारास मुसळधार पाऊस बरसायला सुरुवात झाली.

दरम्यान, राज्यात पुढील तीन दिवस विजांच्या (lightning) कडकडाटासह पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. आज कोकण, मध्य महाराष्ट्र, प. महाराष्ट्र, उ. महाराष्ट्रासह विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.

यंदा अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली असून यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. आता पुन्हा एका जोरदार पाऊस बरसात असल्यामुळे बळीराजा चिंताक्रांत झाला आहें.

त्र्यंबकलाही पावसाची हजेरी

आज दुपारी चारच्या सुमारास त्र्यंबकेश्वर परिसरात पावसाने हजेरी लावली. कोल्हा वाहन असलेल्या हस्ते नक्षत्राचा पाऊस झाला. बुधवारी पाऊस भरून आला होता ढगाळ वातावरण होते पण हजेरी मात्र पावसाने गुरुवारी लावली.

- Advertisment -

ताज्या बातम्या