हरिहरेश्वरचे सौंदर्य
फोटो गॅलरी

हरिहरेश्वरचे सौंदर्य

स्वच्छ, निळा समुद्र व रुपेरी वाळूने आकर्षित करणारा अमर्याद समुद्रकिनारा

Nilesh Jadhav

हरिहरेश्वर हे कोकणातील एक निसर्गरम्य असे पवित्र तीर्थस्थान. एका बाजूला हिरव्यागार गर्द वनश्रीने नटलेला डोंगर तर दुसऱ्या बाजुला नयनरम्य स्वच्छ, निळा समुद्र व रुपेरी वाळूने आकर्षित करणारा अमर्याद समुद्रकिनारा.

तिथले सृष्टीसौंदर्य डोळ्यांचे पारणे फेडणारे आहे. या क्षेत्राला नयनरम्य असा समुद्रकिनारा लाभला आहे.

येथे फेसाळणाऱ्या समुद्राच्या लाटा आणि त्या लाटांचा नाद आपल्या कानात घुमू लागतो. त्या लाटांची लय आपल्याला तरंगातून दिसू लागते.

या सागराचे संगीत ऐकताना मन शांत होते. आयुष्यातील चिंता, काळज्यांना तात्पुरता का होईना पूर्णविराम या ठिकाणी नक्की मिळतो.

आपणही या ठिकाणी एकदा तरी नक्की भेट द्यायला हवी. राहुरीच्या स्वप्नील साळवे यांनी काढलेली आकर्षक छायाचित्रे...

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com