Photo Gallery : सुनील गावस्कर यांचा आज वाढदिवस; पहिल्या सिरीजमध्ये केले ‘वर्ल्ड रेकॉर्ड’

नवी दिल्ली | New Delhi

भारताच्या महान खेळाडूपैकी एक नाव म्हणजे सुनील मनोहर गावस्कर ((Sunil Manohar Gavaskar). आज त्यांचा वाढदिवस (Birthday) आहे. १० डिसेंबर १९४९ रोजी त्यांचा जन्म मुंबईत झाला. गावस्कर यांनी जगातील क्रिकेट खेळणाऱ्या देशांतील सर्वात जबरदस्त बॉलिंगचा सामना केला. त्यांनी कधी मागे फिरून बघितले नाही. क्रिकेट खेळताना त्यांची टेक्निक होती. जगभरातून त्यांच्या खेळीवर स्तुतीसुमनं उधळली जायची…. (Happy Birthday Sunil Gavaskar)

असे राहिले त्यांचे करीयर (Sunil Gavaskar Career)

ते वर्ष १९७०-७१ होते. जेव्हा गावस्कर यांनी वेस्टइंडीजमध्ये (West Indies) आपल्या करीयरची सुरुवात केली. त्यांनी चार टेस्ट सामन्यात चार शतके झळकावली. तब्बल ७७४ धावा त्यांनी कुटल्या तर १५४च्या सरासरीने त्यांनी या धावा काढल्या होत्या. वेस्टइंडीजमध्ये त्यानंतर त्यांनी १३ टेस्ट खेळल्या. सात शतक हे ७० च्या सरासरीने त्यांनी ठोकले होते. तर इग्लंडच्या विरुद्ध ३८ च्या सरासरीने म्हणजे सर्वात कमी सरासरी ठरलेली होती….

३० शतक ठोकणारे पहिले खेळाडू (30 Hundred in test cricket)

गावसकर यांनी आतापर्यंत ३४ शतक कसोटीमध्ये झळकावले आहेत. ज्यामध्य २२ सामने ड्रॉ राहिले. त्यांनी सर डॉन ब्रैडमैन यांच्या २९ कसोटी शतकांचे रेकॉर्डदेखील तोडले होते.

१० हजार आंतरराष्ट्रीय धावा बनवणारे पहिले क्रिकेटर (First Indian who completed 10 thousand runs)

टेस्ट क्रिकेटमध्ये १० हजार धावा बनवणारे ते भारताचे पहिले क्रिकेटर ठरले होते. सलग १०० टेस्ट खेळणारे क्रिकेटरदेखील ते बनले. आपल्या टेस्ट करीयरच्या अखेरच्या सामन्यात त्यांनी पाकिस्तानविरुद्ध ९६ धावांची खेळी केली होती. १९८६-८७ मध्ये त्या सिरीजमध्ये गावसकर यांच्या खेळीची मोठी चर्चा होती. परंतु दुर्दैवाने भारताने हा सामना १६ धावांनी गमावला होता.

गावस्करांचा सन्मान मोठा

गावसकर यांच्या खेळातील योगदानासाठी त्यांना १९८० मध्ये पद्मभूषण (Padmbhushan Award) पुरस्कार मिळाला. याशिवाय १९८० साली त्यांना विजडन क्रिकेटर ऑफ द ईयर (Wisdom cricketer of the year) साठीदेखील निवडण्यात आले. २००९ मध्ये ते आईसीसी हॉल ऑफ द फेम मध्ये सामिल झाले. तसेच २०१२ मध्ये त्यांना सीके नायडू लाइफटाइम अचिव्हमेंट अवॉर्ड देण्यात आला.

गावस्करांचा केविलवाणा विक्रम

१९७५ साली पहिला विश्वचषक खेळवण्यात आला. यामध्ये गावसकर यांनी ७ जून १९७५ इंग्लंडच्या विरुद्ध १७४ चेंडूत नाबाद ३६ धावांची खेळी केली होती. या खेळीची आठवण आजही सर्वांना आल्याशिवाय राहत नाही.

असे राहिले करियर

गावसकर यांनी करियरच्या १२५ टेस्ट आणि १०८ वनडे सामने खेळले. त्यांच्या नावे टेस्ट करियरमध्ये10 हजार 122 धावा आणि वनडे सामन्यात 3 हजार92 धावा आहेत. टेस्टमध्ये त्यांनी 34 शतक आणि ४५ अर्धशतके झळकावली.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *