Photo माहिती व जनसंपर्क खात्याच्या चित्रप्रदर्शनाला ना.गुलाबराव पाटील यांची भेट

Photo माहिती व जनसंपर्क खात्याच्या चित्रप्रदर्शनाला ना.गुलाबराव पाटील यांची भेट

मुंबई / जळगाव - प्रतिनिधी mumbai - jalgaon

महाविकास आघाडी सरकारच्या दोन वर्षातील कामगिरीबाबत मंत्रालयात (Ministry) भरविण्यात आलेल्या (Picture display) चित्र प्रदर्शनाला राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तसेच जळगावचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील (Guardian Minister Gulabrao Patil) यांनी भेट देऊन माहिती जाणून घेतली.

या माध्यमातून सरकारच्या कामांचे अतिशय उत्तम प्रकारे मांडणी करण्यात आल्याबद्दल त्यांनी कौतुक केले. राज्याच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे (Directorate General of Information and Public Relations) मंत्रालयात चित्र प्रदर्शन भरविण्यात आले आहे.

यात महाविकास आघाडी सरकारच्या दोन वर्षातील कामांना अतिशय परिणामकारक अशा फलकांच्या माध्यमातून दर्शविण्यात आलेले आहे.

आज ना.गुलाबराव पाटील यांनी या चित्र प्रदर्शनाला भेट देऊन याबाबतची विस्तृत माहिती जाणून घेतली.

सरकारच्या कामाला डीजीआयपीआरतर्फे चांगल्या प्रकारात प्रसिध्दी दिली जात असल्याबद्दल त्यांनी कौतुक केले.

तसेच त्यांनी याप्रसंगी ३६० अंशातील सेल्फी (Selfie) देखील घेऊन आपला अभिप्राय सादर केला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com