Photo Gallery: नाशकात गुढीपाडव्याचा जल्लोष; लेझीम, पारंपारिक वेशभूषा आणि बरंच काही...

Photo Gallery: नाशकात गुढीपाडव्याचा जल्लोष; लेझीम, पारंपारिक वेशभूषा आणि बरंच काही...

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नाशकात आज सकाळपासून मराठी नववर्षाचा जल्लोष बघायला मिळतो आहे. ठिकठिकाणी रांगोळी काढण्यात आली आहे. तर पारंपारिक वेशभूषेत महिलांनी लेझीम सादर करत लक्ष वेधले....

(सर्व फोटो : ज्ञानेश्वर जाधव, सतीश देवगिरे व प्रशांत कुटे)

आज सकाळपासून सातपूर, मध्यनाशिकसह त्रिमूर्ती चौक नाशिकरोड आणि पंचवटी परिसरात ठिकठिकाणी गुढया उभारण्यात आल्या असून ढोल-ताशांच्या गजरात मराठी नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात येत आहे.

दोन दिवसांपूर्वी राज्य सरकारने करोनाचे निर्बंध पूर्णपणे हटवले आहेत. दुसरीकडे, मास्कदेखील ऐच्छिक केलेले आहे. त्यामुळे अनेकांची मास्कपासून सुटका झाली असून मोठ्या प्रमाणात नागरिकांनी आज गुढीपाडव्याच्या शोभायात्रांमध्ये सहभागी होत येथील जल्लोषात भर घातली.

शहराच्या कानाकोपऱ्यातून या शोभायात्रांना गर्दी झाली आहे. आज दिवसभर या शोभायात्रांचे ठिकठिकाणी आयोजन करण्यात आले असून प्रचंड जल्लोष सध्या नाशिक शहरात बघायला मिळत आहे.

Related Stories

No stories found.