Photo Gallery : सुवर्णमहोत्सवी विजयी मशालचे भव्य स्वागत

Photo Gallery : सुवर्णमहोत्सवी विजयी मशालचे भव्य स्वागत

नाशिक | प्रतिनिधी Nashik

भोंसला मिलिटरी कॉलेजच्या रणगाड्याजवळ आज सकाळी पावणे आठ वाजेच्या सुमारास ‘१९७१ भारत-पाकिस्तान युद्ध सुवर्णमहोत्सवी विजयी मशालचे भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी भोंसला मिलिटरी कॉलेजमधील सर्व अधिकारी,शहरातील दिग्गज व्यक्ती व लष्करी अधिकारी सहभागी होते....

महाविद्यालयातील सर्व खेळाडू, रामदंडी, अश्वपथक, लेझीमपथक, घोष पथक यांच्या समवेत विजयी मशाल कॅम्पसमधील रणगाडा आणि लगतच्या सहा किलोमीटर परिसरात संचलन यावेळी करण्यात आले.

ए. बी. बी. सर्कल, भोंसला भवन,टी.ए. कुलकर्णी सर्कल, कॉलेज रोड,शहीद स्मारक गंगापूर रोड,जेहान सर्कल, भोंसला महाविद्यालय,असे संचलनाद्वारे मार्गक्रमण करण्यात आले.

भोंसला कॉलेजच्या रणगाड्याजवळ सुरवातीला स्वागत झाले. त्यानंतर पुढे मिलिटरी स्कूल मध्ये शहीद स्मारक येथे स्वागत झाले.

यावेळी शहीद स्मारकास पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. पदाधिकार्‍यांच्या हस्ते १९७१ च्या युद्धात सामील झालेल्या शूर सैनिकांचा सत्कार पार पडला. यावेळी संस्थेचे सरकार्यवाह डॉ. प्रा. दिलीप बेलगावकर, कार्यवाह हेमंत देशपांडे यांच्यासह संस्थेचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

बलिदान अधोरेखीत करण्याचा उद्देश

१६ डिसेंबर २०२० पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्ली येथील राष्ट्रीय युद्ध स्मारकाच्या चिरंतन ज्योतीतून विजयाची ज्योत प्रज्वलित करण्यात आली. १९७१ च्या भारत पाक युद्धातील युद्ध नायकांशी संपर्क साधण्यासाठी स्वर्णिम विजय मशाल पुण्याहून नाशिकला आली. १९७१ मध्ये बांगलादेश पाकिस्तान पासून मुक्त करण्यात आला. त्या संदर्भात भारताच्या यशाच्या सुवर्णमहोत्सवी, स्वर्णिम वर्ष म्हणून जाहीर केले. हे बलिदान अधोरेखित करण्यासाठी, १९७१ च्या युद्धात भारतीय सशस्त्र दलाच्या शूर सैनिकांचे शौर्य, आणि समर्पण ओळखणे आणि त्यांचा सन्मान करणे हा उद्देश आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com